दिल्लीची हवाच खराब, जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून नोंद


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी किती वाईट आहे, याचा जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2021 प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात, संयुक्त राष्ट्र पर्यावरण संरक्षण संस्थेने जगभरातील हवेच्या गुणवत्तेचं रँकिंग जारी केलं आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचं म्हटलं आहे.Delhi is the worst polluted city in the world

अहवालातील डब्ल्यूएचओच्या हवेच्या गुणवत्ताविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारतातील कोणत्याही शहरानं त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता केलेली नाही. अहवालात शहरी पीएम 2.5 प्रदूषणापैकी 20 ते 35 टक्के प्रदूषण वाहनांमुळं झालेलं प्रदूषण म्हणून नोंदवलं गेलं आहे. जागतिक वायू गुणवत्ता निदेर्शांकामध्ये, भारतातील नवी दिल्ली सर्वात प्रदूषित (85.5) म्हणून गणली गेली आहे.



बांगलादेशातलं ढाका (78.1) दुसºया क्रमांका वरआहे. चौथ्या क्रमांकावर कझाकिस्तानचं दुशान्बे, पाचव्या क्रमांकावर ओमानचं मस्कत, सहाव्या क्रमांकावर नेपाळचं काठमांडू, सातव्या क्रमांकावर बहारीनचे मनामा, आठव्या क्रमांकावर इराकचं बगदाद, 9 व्या क्रमांकावर किरगिझस्तानचा बिश्केक, 10 वा क्रमांक उझबेकिस्तानच्या ताश्कंदचा आहे. पाकिस्तानचं इस्लामाबाद (41.1) प्रदूषणाच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, ते नवी दिल्लीपेक्षा स्वच्छ मानलं गेलं आहे.

राजधानीतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणि ते अधिक स्वच्छ करण्यासाठी दिल्ली सरकारकडून अनेक मोठमोठ्या मोहिमा सातत्यानं राबविण्यात आल्या आहेत. असं असूनही, जागतिक वायू गुणवत्ता अहवालात जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचा समावेश झाल्यामुळं या सर्व मोहिमा कुचकामी ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

Delhi is the worst polluted city in the world

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात