वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना काळामध्ये दिल्लीतील वकिलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. हे संकट हाताळण्यात व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. Delhi high court lashes on Govt.
सुनावणीवेळी न्यायाधीश म्हणाले की, ‘‘ आम्ही तुमचे दुःख समजू शकतो. आम्ही देखील याच संकटाचा सामना करत आहोत. कोरोना एवढ्या भीषण पद्धतीने वाढेल आणि एवढा तीव्र हल्ला करेल असे कुणालाच वाटले नव्हते. येथे पैशांचा प्रश्नलच नाही. खरी समस्या ही पायाभूत सेवांची आहे.
आमच्याकडे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, ऑक्सिजन आणि औषधी यापैकी काहीच नाही. आमची व्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होताना दिसते.’’
याचिकाकर्त्या वकिलांच्यावतीने न्यायालयास सांगितले की, ‘‘ काही खासगी रुग्णालयांनी वकिलांवर उपचार करण्याची तयारी दर्शविली आहे पण त्यांच्याकडे केवळ ऑक्सिजन बेड असून आयसीयू बेडची त्यांच्याकडे टंचाई आहे. त्यामुळे काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये उपचार मिळणे गरजेचे आहे. वकिलांना पैसे नको आहेत, कोणत्याही स्थितीमध्ये त्यांना वैद्यकीय मदत मिळायला हवी. वकिलांच्या आरोग्यविषयक खर्चासाठी आम्ही निधी गोळा करू.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App