इस्राईलमध्ये चेंगराचेंगरीत ४४ ठार; धार्मिक उत्सव साजरा करताना दुर्घटना


विशेष प्रतिनिधी

जेरुसलेम – इस्राईलमधील माउंट मेरॉनवर ‘लाग बीओमर’ हा धार्मिक उत्सव साजरा होत असताना चेंगराचेंगरी होऊन ४४ भाविकांचा मृत्यू झाला तर १५० जण जखमी झाले. इस्राईलमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने तेथे खुल्या जागेत मास्क घालण्याची सक्ती आणि अन्य काही निर्बंध उठविण्यात आले होते. 44 people dead in Israel

गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या साथीनंतर साजरा होणारा ‘लाग बीओमर’ हा पहिलाच सार्वजनिक उत्सव असल्याने माउंट मेरॉनवर काल सायंकाळी एकच गर्दी झाली होती. त्यात युवकांचा विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती.



कोरोनाचे निर्बंध धुडकावून लाखो भाविक माउंट मेरॉनवर जमलेले असताना ही दुर्घटना मध्यरात्री घडली. ‘लाग बीओमर’ हा इस्राईलमधील परंपरावादी ज्यू धर्मीयांचा प्रमुख धार्मिक उत्सव आहे. हिब्रू महिना आयरच्या १८ व्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.

काल रात्रभर शेकोटी, प्रार्थना आणि नृत्य असे कार्यक्रम सुरू असतानाच चेंगराचेंगरी होऊन ४४ जणांचा मृत्यू झाला तर १५० जण जखमी झाले असून त्यातील अनेकांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. माउंट मेरॉनवर काल एक लाख नागरिक जमले होते. आणखी एक लाख लोक आज सकाळी येणार होते, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

चेंगराचेंगरी कशी झाली याबद्दल पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात काही जण निसरड्या वाटांवरून घसरून पडले. त्यांच्या अंगावर अनेक जण पडल्याने एकच गोंधळ उडाला. प्रत्येक जण तेथून निसटण्याचा प्रयत्न करीत असल्याने चेंगराचेंगरी झाली, असे निदर्शनास आले.

44 people dead in Israel

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात