स्थूल व्यक्तींना कोरोनाचा धोका जास्त, ‘लॅन्सेट’च्या अहवालातील निरीक्षण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – जास्त वजन अथवा स्थूल व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो, असे मत ‘द लॅन्सेट डायबेटिक अँड एंडोक्रिनोलॉजी’ या विज्ञानविषयक नियतकालिकाने नोंदविले आहे. Overweight people is in dangerous situation due to corona

शरीरातील चरबी मोजण्याचे ‘बीएमआय’ हे एक मोजमाप आहे, जे एखाद्या व्यक्तीच्या उंची आणि व जनाच्या आधारावर मोजले जाते. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ६९ लाखांपेक्षा अधिक लोकांची पाहणी करून आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधित झालेले किंवा मृत्यू पावलेल्या २० हजार जणांच्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे.



संशोधकांच्या निरीक्षणानुसार २३ किलोग्रॅम प्रति वर्ग मीटर ‘बीएमआय’ (जी निरोगी श्रेणी समजली जाते)पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींसाठी कोरोना संसर्गाचा धोका जास्त असतो. या सामान्य श्रेणीपेक्षा वाढणाऱ्या प्रत्येक एक युनिटमागे रुग्णालयात दाखल करण्याचा धोका पाच टक्के असतो तर ‘आयसीयू’मध्ये ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता दहा टक्के असते, असे अहवालात नमूद केले आहे.

ज्या लोकांचे वजन कमी असते म्हणजेच ज्यांचे ‘बीएमआय’ १८. ५ पेक्षा कमी आहे, त्यांनाही कोरोना होण्याची धोका निर्माण होऊ शकतो. स्थूलत्वामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका २० ते ३९ वर्षे या वयोगटातील युवा वर्गाला असतो. वयाच्या साठीनंतर हा धोका कमी होते, तर ‘बीएमआय’मधील वाढीने कोरोनाचा होण्याचे प्रमाण ८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तिंमध्ये अत्यल्प असते, अशी नोंदही अहवालात आहे.

Overweight people is in dangerous situation due to corona

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात