ऑक्सिजन ऑडिटची वेळ येताच दिल्ली सरकारचा यूटर्न, गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन असल्याचे म्हणत इतर राज्यांना देण्याचे केंद्राला पत्र

Delhi Government Writes Centre to Divert Surplus Oxygen Supply To Other States

Surplus Oxygen : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी म्हटले की, दिल्ली सरकारने केंद्राला असे पत्र लिहिले आहे की राजधानीत आता अतिरिक्त ऑक्सिजन आहे आणि तो इतर राज्यांना दिला जावा. कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या दिल्लीतील लोकांना मदत करण्यासाठी पुढे आल्याबद्दल त्यांनी केंद्र आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे आभार मानले. दरम्यान, सिसोदियांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे. Delhi Government Writes Centre to Divert Surplus Oxygen Supply To Other States


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी म्हटले की, दिल्ली सरकारने केंद्राला असे पत्र लिहिले आहे की राजधानीत आता अतिरिक्त ऑक्सिजन आहे आणि तो इतर राज्यांना दिला जावा. कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या दिल्लीतील लोकांना मदत करण्यासाठी पुढे आल्याबद्दल त्यांनी केंद्र आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे आभार मानले. दरम्यान, सिसोदियांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे.

‘ऑक्सिजन ऑडिटमुळे दिल्ली सरकार घाबरले’

सिसोदियांच्या ‘अतिरिक्त’ ऑक्सिजनच्या विधानावर भाजपने दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ‘जेव्हा ऑक्सिजन ऑडिटचा प्रश्न येतो, तेव्हा हे म्हणत आहेत की ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात आहे. केंद्र सरकारने दररोज दिल्लीला ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवला आणि AAP रोजच आपले अपयश झाकण्यासाठी खोटे बोलत राहिले. AAPचा खोटेपणा आता जनतेसमोर उघड झाला आहे.

दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही केजरीवाल सरकारवर टिप्पणी केली. ऑक्सिजन ऑडिट नाकारल्यानंतर दिल्ली सरकारची डिमांड आपोआप कमी झाली आहे.

सिसोदिया म्हणाले, दिल्लीत ऑक्सिजन अतिरिक्त झाला

उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले की, दिल्लीमध्ये 24 तासांत कोरोनाचे 10,400 नवीन रुग्ण आढळले आणि संसर्गाचा दर 14 टक्के आहे. ते म्हणाले की, जेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढत होते, तेव्हा राष्ट्रीय राजधानीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती, परंतु आता ही रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. ज्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता कमी होऊन 582 मेट्रिक टन झाली आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, आम्ही इतर राज्यांना अतिरिक्त ऑक्सिजन देण्यासाठी केंद्राला पत्र लिहिले आहे. आमचे सरकार जबाबदार सरकार आहे.’

सिसोदियांच्या या विधानानंतर केजरीवाल सरकारवर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात केजरीवाल सरकारने दिल्लीला ऑक्सिजन पुरवठ्यासाठी केंद्राला निर्देश देण्याचा सातत्याने आग्रह धरला. केंद्राकडून दररोज ऑक्सिजन पुरवठा सुरूच होता. प्रत्यक्षात ऑक्सिजन ऑडिटची वेळ आली तेव्हा केजरीवाल सरकारने यूटर्न घेत आता अचानक दिल्लीत गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन असल्याचे म्हटले आहे.

Delhi Government Writes Centre to Divert Surplus Oxygen Supply To Other States

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण