Corona Cases Updates : देशात सलग दुसर्‍या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत ४,१२६ मृत्यूंची नोंद

Todays Corona Cases Updates In India, 3.62 lakh patients and 4126 deaths Recoreded in 24 Hours

Corona Cases Updates : भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. एक-दोन रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर देशातील नवीन कोरोना रुग्णसंख्येने आज साडेतीन लाखांचा टप्पा गाठला आहे. भारतात पुन्हा एकदा 24 तासांत कोरोनाचे 3.62 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. याच काळात कोरोनामुळे 4126 जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. तथापि, आज मृतांची संख्या कालच्या तुलनेत किंचित कमी आहे. परंतु नवीन रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. Todays Corona Cases Updates In India, 3.62 lakh patients and 4126 deaths Recorded in 24 Hours


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. एक-दोन रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर देशातील नवीन कोरोना रुग्णसंख्येने आज साडेतीन लाखांचा टप्पा गाठला आहे. भारतात पुन्हा एकदा 24 तासांत कोरोनाचे 3.62 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. याच काळात कोरोनामुळे 4126 जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. तथापि, आज मृतांची संख्या कालच्या तुलनेत किंचित कमी आहे. परंतु नवीन रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आज देशात कोरोनाचे 362,406 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर याच काळात 4,126 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 37,04,099 पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. तर 1,93,82,642 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केलेली आहे. जगाच्या तुलनेत सध्या भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

एकूण मृत्यू अडीच लाखांपेक्षा जास्त

गुरुवारी भारतातील एकूण मृतांची संख्या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचली. ही संख्या वाढून सुमारे 2 लाख 58 हजार झाली आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत. मात्र, दैनंदिन मृत्यूंच्या बाबतीतही भारत या देशांना मागे टाकत आहे.

सध्या भारतात दररोज रुग्णसंख्या आणि मृत्यूंमध्ये वाढ होत आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे. रॉयर्ट्सच्या कोरोना ट्रॅकरनुसार, जगातील प्रत्येक तिसरा मृत्यू भारतात होत आहे. भारतात दररोज सरासरी 3800 मृत्यू होत आहेत, तर संपूर्ण जगात दररोज सुमारे 12 हजार मृत्यू होत आहेत.

मे महिन्यातील कोरोनाचा आलेख

12 मे 2021 : 3,62,406 नवीन रुग्ण आणि 4,126 मृत्यू
11 मे 2021 : 348,529 नवीन रुग्ण आणि 4,200 मृत्यू
10 मे 2021 : 329,517 नवीन रुग्ण आणि 3,879 मृत्यू
9 मे 2021 : 366,499 नवीन रुग्ण आणि 3,748 मृत्यू
8 मे 2021 : 409,300 नवीन रुग्ण आणि 4,133 मृत्यू
7 मे 2021 : 401,326 नवीन रुग्ण आणि 4,194 मृत्यू
6 मे 2021 : 414,433 नवीन रुग्ण आणि 3,920 मृत्यू
5 मे 2021 : 412,618 नवीन रुग्ण आणि 3,982 मृत्यू
4 मे 2021 : 382,691 नवीन रुग्ण आणि 3,786 मृत्यू
3 मे 2021 : 355,828 नवीन रुग्ण आणि 3,438 मृत्यू
2 मे 2021 : 370,059 नवीन रुग्ण आणि 3,422 मृत्यू
1 मे 2021 : 392,562 नवीन रुग्ण आणि 3,688 मृत्यू

Todays Corona Cases Updates In India, 3.62 lakh patients and 4126 deaths Recorded in 24 Hours

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण