इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पॅलेस्टाईनशी सुरू असलेल्या युद्धावर भाष्य

Israel has a right to defend itself, says US president Joe Biden as Gaza violence escalates

US president Joe Biden : इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाविषयी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, इस्रायलला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे. गाझा पट्टी आणि इस्रायल यांच्यात 2014 नंतरचा सर्वात मोठा संघर्ष पेटलेला आहे. व्हाइट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना जो बायडेन म्हणाले, मला आशा आहे की हा संघर्ष लवकरच संपुष्टात येईल. त्याचवेळी ते म्हणाले, आपल्या सीमेवर हजारो रॉकेट उडत असताना इस्रायलला स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क आहे. Israel has a right to defend itself, says US president Joe Biden as Gaza violence escalates


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाविषयी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, इस्रायलला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण हक्क आहे. गाझा पट्टी आणि इस्रायल यांच्यात 2014 नंतरचा सर्वात मोठा संघर्ष पेटलेला आहे. व्हाइट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना जो बायडेन म्हणाले, मला आशा आहे की हा संघर्ष लवकरच संपुष्टात येईल. त्याचवेळी ते म्हणाले, आपल्या सीमेवर हजारो रॉकेट उडत असताना इस्रायलला स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क आहे.

इस्रायल आणि हमासमधील संघर्ष संपविण्यासाठी अमेरिकेने आपले इजिप्त आणि कतारमधील मुत्सद्दी पाठवले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायलवर हमासकडून रॉकेट हल्ले केले आहेत, तर इस्रायलींनीही हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 60 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या हिंसाचारात 60 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, तर 6 इस्रायलींचाही मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी हमासच्या वतीने तेल अवीव येथे रॉकेटद्वारे हल्ले करण्यात आले. इस्रायलसाठी तेल अवीव हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, हमासला या हल्ल्यांची मोठी किंमत मोजावी लागेल. हमासला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीतील अनेक इमारतींवर हल्ला केला आहे. व्हिडिओंमध्ये या इमारती पडताना दिसल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी बुधवारी कतारचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांच्याशी चर्चा केली. याव्यतिरिक्त अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटॉइन ब्लिंकेन यांनी पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी संवाद साधला. यापूर्वी ते नेतन्याहू यांच्याशी बोलले होते आणि म्हणाले की, आता या भागात शांतता पूर्ववत करण्याची आवश्यकता आहे.

Israel has a right to defend itself, says US president Joe Biden as Gaza violence escalates

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात