कोरोना संसर्गातून बरे झाल्यावर कधी घ्यावी लस, सरकारच्या तज्ज्ञ समितीने काय म्हटले? वाचा सविस्तर…

govt panel Suggest To Defer vaccination for 6 months after recovery from Covid-19

vaccination : एखाद्याला कोरोना झाला असेल तर त्याने लस कधी घ्यावी? लसीच्या दोन डोसमध्ये किती अंतर असावे यासारख्या प्रश्नांवर राष्ट्रीय सल्लागार समितीने सरकारला नव्या सूचना दिल्या आहेत. यानुसार, जर तुम्ही कोरोनावर मात केली असेल तर लस घेण्यापूर्वी सहा महिन्यांचा काळ जाऊ द्यावा. प्रतिकार क्षमतेवर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) या सूचना दिल्या आहेत. याशिवाय कोव्हिशील्डच्या दोन डोसमध्येही 12ते 16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याची सूचना त्यांनी केली आहे. सध्या हेच अंतर 6 ते 8 आठवडे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशात सध्या लसींच्या सुरू असलेल्या तुटवड्याच्या काळातच सल्लागार समितीच्या या सूचना आल्या आहेत. govt panel Suggest To Defer vaccination for 6 months after recovery from Covid-19


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एखाद्याला कोरोना झाला असेल तर त्याने लस कधी घ्यावी? लसीच्या दोन डोसमध्ये किती अंतर असावे यासारख्या प्रश्नांवर राष्ट्रीय सल्लागार समितीने सरकारला नव्या सूचना दिल्या आहेत. यानुसार, जर तुम्ही कोरोनावर मात केली असेल तर लस घेण्यापूर्वी सहा महिन्यांचा काळ जाऊ द्यावा. प्रतिकार क्षमतेवर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) या सूचना दिल्या आहेत. याशिवाय कोव्हिशील्डच्या दोन डोसमध्येही 12ते 16 आठवड्यांचे अंतर ठेवण्याची सूचना त्यांनी केली आहे. सध्या हेच अंतर 6 ते 8 आठवडे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशात सध्या लसींच्या सुरू असलेल्या तुटवड्याच्या काळातच सल्लागार समितीच्या या सूचना आल्या आहेत.

NTAGIच्या सूचना आता कोरोनावरील लस प्रशासनाच्या राष्ट्रीय तज्ज्ञ समितीकडे (NEGVAC) मंजुरीसाठी जातील. मार्च महिन्यात केंद्र सरकारने सीरमच्या कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 28 दिवसांऐवजी 6 ते 8 आठवडे असे वाढवले होते. याचवेळी भारत बायोटेकच्या दोन डोसमधील अंतरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

दुसऱ्या एका घोषणेमध्ये समितीने म्हटले होते की, गर्भवती स्त्रियांनी उपलब्ध दोन्ही लसींपैकी एक घ्यायला हवी, तसेच प्रसूतिनंतर स्तनदा मातांनीही केव्हाही लस घेतली तरी चालते. ऑब्टेट्रिक्स आणि गायनेकॉलॉजी या जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, गर्भवती स्त्रियांमधील प्लॅसेंटाला लसीमुळे कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, या संशोधनात सहभागी झालेल्या बहुतांश महिलांनी एकतर मॉडर्ना किंवा फायझरची लस घेतलेली होती. भारतात अद्यापही या लस आलेल्या नाहीत. तथापि, या अभ्यासामुळे लसींची भीती नक्कीच कमी होईल, विशेष गर्भवती स्त्रियांना यामुळे मोठा दिलासा मिळेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

govt panel Suggest To Defer vaccination for 6 months after recovery from Covid-19

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण