दिल्ली भाजपच्या नेत्याची भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींना अब्रूनुकसानीची नोटीस


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना अब्रूनुकसानीची दिवाणी आणि फौजदारी कारवाईची नोटीस पाठवली आहे. Delhi BJP leader issues notice to BJP MP Subramaniam Swamy

तेजिंदर पाल सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापूर्वी तेजिंदर पाल सिंग हे अनेकदा छोट्या-मोठ्या गुन्ह्यासाठी तुरुंगात गेले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना याची माहिती पाहिजे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले होते. यात त्यांनी दिल्लीतल्या एका पत्रकाराचा हवाला दिला होता. परंतु त्याचे नाव दिले नव्हते.सुब्रमण्यम स्वामी यांनी हे ट्विट केल्यानंतर तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी त्यांना 48 तासांची मुदत दिली होती. आरोप सिद्ध करा अन्यथा कायदेशीर कारवाई करीन असा इशारा बग्गा यांनी दिला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी 48 तास उलटल्यानंतरही खुलासा न केल्यामुळे तेजिंदर पाल सिंग यांनी सुब्रमण्यम स्वामींना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी तेजिंदर पाल सिंग बघा यांच्या विरोधातील गुन्ह्यासंदर्भात ज्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यांच्या नोंदींचा हवाला दिला आहे, त्या नोंदी सादर कराव्यात. कोणत्या पत्रकाराने त्यांना ही माहिती दिली त्याचे नाव द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. याबाबत सुब्रमण्यम स्वामी यांच्या प्रत्युत्तराची प्रतीक्षा आहे.

Delhi BJP leader issues notice to BJP MP Subramaniam Swamy

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय