केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर भाजपच्या तालुकाध्यक्षाचाच आत्महत्येचा प्रयत्न


विशेष प्रतिनिधी

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थासमोर बुलडाणा जिल्ह्यातील भाजपच्या तालुकाध्यक्षानेच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच पकडले. मात्र, विषाचे काही अंश त्याच्या पोटात गेल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.Attempted suicide of BJP taluka president in front of Union Minister Nitin Gadkari’s house

विजय पवार (वय ५०) असे या व्यक्तीचे नाव असून ते बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरचे रहिवासी आहेत. शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गावरील मेहकर ते लोणार दरम्यानच्या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत विजय पवार यांनी तक्रारी करून यापूर्वी उपोषण केले होते.



गणपती विसर्जनानंतर या रस्त्याचे काम करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्याने त्यांच्या उपोषणाची सांगता झाली होती. मात्र, त्या कामाला सुरुवात न झाल्याने विजय पवार यांनी ‘ ३० सप्टेंबर पर्यंत संबंधित विभागाने या कामाला सुरवात न केल्यास उपविभागीय कार्यालय मेहकर ,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कार्यालय मेहकर, जिल्हाधिकारी कार्यालय , आमदार आकाश फुंडकर खामगांव, किंवा नितिन गडकरी यांचे नागपुरातील निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा ईशारा दिला होता’.

गडकरी यांच्या निवासस्थानासमोरची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांचा मोठा ताफा हॉटेल रॅडिसनच्या बाजूला असलेल्या गडकरी यांच्या निवासस्थानासमोर नेमण्यात आला होता. सायंकाळी ५.३० च्या सुमारास विजय पवार अचानक ईमारतीसमोर धावत आले आणि त्यांनी घोषणाबाजी करीत एक बाटली तोंडाला लावली.

पवार यांची घोषणाबाजी ऐकून पोलीस निरीक्षक विद्या जाधव आपल्या सहकाऱ्यांसह पवार यांच्याकडे पळत आल्या. त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेतली. त्या बाटलीतील काही द्रवपदार्थ तोंडात गेल्याने पवार यांची प्रकृती बिघडत असल्याचे ध्यानात आल्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने आपल्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले.आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने गडकरी नागपुरातच होते. ते येथे असताना त्यांच्या निवासस्थानासमोर ही घटना घडली.

Attempted suicide of BJP taluka president in front of Union Minister Nitin Gadkari’s house

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात