वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ” मला आनंद आहे की आज देशभरातील लाखो गावांतील लोक ‘ग्रामसभे’च्या माध्यमातून ‘जल जीवन मिशन’ वर संवाद आयोजित करत आहेत. जल जीवन मिशनद्वारे फक्त लोकांना पाणी उपलब्ध करून देणे नाही. तर विकेंद्रीकरणाची ही एक मोठी चळवळ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या जलजीवन मिशनसाठी एक ॲप लॉन्च केले. तसेच ग्रामपंचायतीशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. Jal Jeevan Mission is not just for water supply but it is a movement for decentralization: PM Modi; Launch the Water Life Mission app
पंतप्रधान मोदी यांनी जल जीवन समिती , ग्राम पाणी आणि स्वच्छता समितीशी जल जीवन मिशन आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ही एक गाव पातळीवरील आणि महिलानी चालविलेली चळवळ आहे. त्याचा मुख्य आधार जनआंदोलन आणि लोकसहभाग आहे. जल जीवन मिशन अॅपवर, या चळवळीसंबंधी प्रत्येक तपशील एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
जलशक्ती मंत्रालयाने जलजीवन मिशनसाठी एक जल जीवन कोश देखील सुरू केला आहे. ज्यामध्ये कोणत्याही संस्था, कंपनी किंवा स्वयंसेवी संस्था व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती देणगी देऊ शकते जेणेकरून शाळांमध्ये किंवा अंगणवाडी केंद्रांमध्ये किंवा ग्रामीणआश्रमात पाणीपुरवठा करण्यासाठी नळ बसवता येतील.
१५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधानांनी जल जीवन मिशनची घोषणा केली. या अंतर्गत प्रत्येक घरात स्वच्छ नळाचे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरीच्या ग्रामस्थांशी जल जीवन मिशन संदर्भात संवाद साधला.२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दादरी जिल्ह्यातील सर्व १६८ ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसंवादाचा कार्यक्रम झाला. गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने पंतप्रधानांच्या अभिभाषणाचे थेट प्रक्षेपण दाखवले. त्यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App