नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. चिनी सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये छापून आलेले एक छायाचित्र सध्या चर्चेचा विषय आहे.The ‘it’ photo taken by Chinese satellites is going viral.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अवकाशात सोडलेल्या अनेक उपग्रहांमुळे आजघडीला चीन अंतराळ क्षेत्रातील मोजक्या महासत्तांपैकी एक आहे. अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे चीन आजघडीला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवू शकतो.
नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आला आहे. चिनी सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाईम्स’मध्ये छापून आलेले एक छायाचित्र सध्या चर्चेचा विषय आहे. येथील चँगचून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (CUST) यंदाच्या पदवीदान सोहळ्यात हे छायाचित्र पृथ्वीपासून ६५० किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून टिपण्यात आले होते. मात्र, हे छायाचित्र साध्यासुध्या कॅमेऱ्यातून टिपले नसून शक्तिशाली उपग्रहांच्या माध्यमातून काढण्यात आले आहे.
त्यामुळेच सध्या या छायाचित्राची जगभरात चर्चा आहे.CUST हे विद्यापीठ चीनमधील जिलिन प्रांतात आहे. याठिकाणी पदवीदान सोहळ्यावेळी विद्यार्थी लाल आणि पिवळ्या रंगाची कार्ड घेऊन CUST हे नावर तयार होईल अशा विशिष्ट रचनेत उभे राहिले होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पावणेदहा वाजता चीनच्या दोन उपग्रहांनी अंतराळातून या सर्वांचा फोटो टिपला.
CGSTC कडून अंतराळात चिनी उपग्रहांचे एक जाळे तयार करण्यात आले आहे. यामध्ये पृथ्वीपासून अगदी जवळच्या अंतरावर फिरणाऱ्या १३८ उपग्रहांचा समावेश आहे. त्यामुळे चीन जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील छायाचित्रे क्षणात मिळवू शकतो.
जिलिन-१ नेटवर्कमधील उपग्रहांच्या माध्यमातून टिपण्यात आलेली माहिती ऑगस्ट २०२० मध्ये पाकिस्तानला पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या स्थानाविषयीचा गोपनीय तपशील आणि छायाचित्रांचा यामध्ये समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App