गडकरीच्या विकास कामांमध्ये पक्षाचा विचार नसतो; शरद पवारांची स्तुतिसुमने; मग महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा निधी वाटपात पक्षपात का??


विशेष प्रतिनिधी

नगर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे विकास कामे करताना पक्षाचा विचार करत नाहीत, तर विकास कामांचा विचार करतात. सर्व पक्षांमधल्या लोक प्रतिनिधींची ते कामे करतात. त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्याच वेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अर्थमंत्री मात्र निधी वाटपात दुजाभाव करतात, हा आरोप शिवसेनेच्या आमदारांकडून होत असताना त्याकडे मात्र पवारांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. Gadkari’s development work has no party affiliation; Praises for Sharad Pawar; So why is there bias in the distribution of NCP funds in Maharashtra ??

नगरमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनाचा आणि लोकार्पणाचा कार्यक्रम नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या संयुक्त उपस्थितीत झाला. पवारांना या कार्यक्रमासाठी नितीन गडकरींच्या कार्यालयातून निमंत्रण देण्यात आले होते. नगर जिल्ह्यात हा राजकीय वादाचा विषय बनला आहे. कारण नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील या कार्यक्रमाचे संयोजक होते. त्यांनी शरद पवारांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले नसल्याचा खुलासा केला होता. परंतु नितीन गडकरी यांच्या आमंत्रणावरून शरद पवार आवर्जून त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या गडकरींवर उधळलेल्या स्तुतीसुमनांकडे पाहिले पाहिजे जात आहे. शरद पवार आणि विखे पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि गडकरी यांची मैत्री देखील तशीच सर्वश्रुत आहे. हा या मागचा महत्त्वाचा राजकीय संदर्भ आहे.



शरद पवार म्हणाले की, नितीन गडकरी हे विकासाची दृष्टी असणारे मंत्री आहेत. त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालय हातात घेण्यापूर्वी देशात पाच हजार किलोमीटरची कामे सुरू होती. त्यांनी काम सुरू केल्यानंतर आज देशात बारा हजार किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडते. मी जिथे जातो तेथे रस्त्याने प्रवास करतो. लोक मला भेटतात त्यावेळी ते मलाही गडकरी साहेबांची कृपा आहे हे आवर्जून सांगतात, अशी आठवण शरद पवार यांनी या कार्यक्रमात सांगितली.

एकीकडे शरद पवारांनी गडकरींच्या पक्षविरहित विकास कामांची स्तुती केली. परंतु त्याच वेळी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेच्या आमदारांनी निधी वाटपात दुजाभाव करत असल्याचा आरोप केला आहे. त्याविषयी मात्र शरद पवारांनी सोयीस्कररीत्या मौन बाळगले आहे. शिवसेनेचे आमदारही विकास कामांसाठी निधी मागत असतात. मात्र या निधी वाटपात पक्षपात केला जातो, असा उघड आरोप ते अजित पवारांवर करतात. अजित पवारांवरचे पक्षपाताचे आरोप आजचे नाहीत. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत या तक्रारी नेल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आपल्या आमदारांना बळ देण्यासाठी निधी वाटपात दुजाभाव करतात, अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तरी मुख्यमंत्री अद्याप गप्प असल्याची खंत देखील शिवसेनेचे आमदार व्यक्त करतात. परंतु, शरद पवारांनी गडकरींच्या पक्षविरहित विकासकामांवर स्तुतीसुमने उधळत असताना आपल्या पक्षातल्या अजितदादांचा सारख्या महत्त्वाच्या नेत्यावर पक्षपाताचा आरोप होत असताना मौन बाळगल्याचे दिसून येत आहे.

Gadkari’s development work has no party affiliation; Praises for Sharad Pawar; So why is there bias in the distribution of NCP funds in Maharashtra ??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात