Pawar vs Vikhe : शरद पवारांसोबत एकाच मंचावर येण्यास विखे पाटलांचा नकार-तर शरद पवार नितीन गडकरी यांचा एकत्र पुणे ते नगर हवाईप्रवास 


खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पण यादरम्यान राधाकृष्ण विखेंची अनुपस्थिती जाणवत होती. त्यांच्या गैरहजेरीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.Pawar vs Vikhe: Vikhe Patil refuses to come on the same stage with Sharad Pawar – Sharad Pawar and Nitin Gadkari travel together from Pune to Nagar


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : आज नगरमधल्या कार्यक्रमासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार एकत्र येणार होते. सोबतच गडकरी देखील येणार होते. पण या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी पवारांसोबत एकाच मंचावर हजेरी लावण्याचं टाळलं आहे.

शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी एकाच हेलिकॉप्टरमधून पुणे ते नगर हवाईप्रवास केला. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ते नगरमध्ये दाखल झाले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. पण यादरम्यान राधाकृष्ण विखेंची अनुपस्थिती जाणवत होती. त्यांच्या गैरहजेरीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागताला नगरमधील सगळे राजकीय नेते हेलिपॅडवर जमले होते. त्यावेळी सुजय विखे यांनी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले तर आमदार रोहित पवार यांना हँडशेक करुन त्यांची खुशाली विचारली.गडकरी यांचा हस्ते महामार्गाचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर येणार आहे. आज 10.45 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाकडे नगरचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

नगर परिसरातील कोणकोणत्या विकासकामांचं भूमीपूजन?

या कामांचे भूमिपूजन होणार आहे. अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.

नेमका काय आहे विखे vs पवार वाद?

शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्ष चालत आला होता. त्यांच्यात दोन गट होते. पण 1991 च्या लोकसभा निवडणुकीत हा वाद खऱ्या अर्थाने पेटला. या निवडणुकीत नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखेंना टाळून काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना दिली होती.

बाळासाहेब विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढले. या निवडणुकीत बाळासाहेब विखेंचा पराभव झाला. पण स्वतःच्याच जिल्ह्यात झालेला हा पराभव बाळासाहेब विखेंच्या जिव्हारी लागला होता.बाळासाहेब विखेंनी आचारसंहितेचा धागा पकडत विजयी उमेदवार यशवंतराव गडाख यांच्याविरोधात तक्रार केली. या निवडणुकीत जात आणि धर्माच्या आधारावर मतं मागितली गेल्याचा त्यांनी आरोप केला.

बाळासाहेब विखेंनी या प्रकरणी पुरावे जमा केले, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि आरोपी होते यशवंतराव गडाख, तर सहआरोपी म्हणून शरद पवारांचं नाव होतं. शरद पवार या प्रकरणातून यशस्वीरित्या बाहेरही पडले होते.

पुढच्या पिढीतही वाद कायम सुरूच राहणार

बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यातला वाद उभ्या महाराष्ट्राला परिचित असला तरी हा वाद मात्र दुसऱ्या पिढीतही सुरु आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातही फार सौख्य नाही. सुजयला नातू समजून पवारांनी जागा सोडावी, असं विखे पाटील म्हणाले होते. पण ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

Pawar vs Vikhe: Vikhe Patil refuses to come on the same stage with Sharad Pawar – Sharad Pawar and Nitin Gadkari travel together from Pune to Nagar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय