विजय वडेट्टीवार यांनीच केला मागासवर्ग आयोगाचा बट्टयाबोळ, सदस्य निवडीत घोटाळा


विशेष प्रतिनिधी

पुणे : गेल्या सात आठ महिन्यांत ओबीसी हिताचा मोठा कळवळा दाखविणारे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रत्यक्ष कृती ओबीसींचे अपरिमीत नुकसान करणारी आहे. वडेट्टीवार यांच्या विभागाच्या माध्यमातून नेमलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या नियुक्तीत घोटाळा झाला असून काही पात्रता नसणारे सदस्य आयोगाच्या माथी मारण्यात आले आहेत.  स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वडेट्टीवार यांनी आयोगाचा बट्ट्याबोळ करून टाकला आहे, अशी टीका धनगर विवेक जागृतीचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली.Backward Classes Commission scam by Vijay Vadettiwar

पुणे येथील लक्षवेधी आंदोलनात ढोणे यांनी हे आरोप केले. बोगस प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची पीएचडी शोधून दाखविण्याचे  आव्हानही त्यांनी दिले.राज्य मागासवर्ग आयोगावर नेमण्यात आलेल्या सदस्यांची चारित्र्य व कागदपत्र पडताळणी करावी, अपात्र सदस्य वगळावेत व पात्र सदस्यांची नियुक्ती करावी,  या मागणीसाठी गांधी जयंतीचे औचित्य साधून, शनिवारी २ ऑक्टोबरला पुणे येथील राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.



ढोणे म्हणाले, ओबीसींच्या हितासाठी ठोस, कृतीशील काम करण्याची जबाबदारी मंत्री वडेट्टीवार यांच्यावर आहे, मात्र वडेट्टीवार ते काम सोडून फक्त भाषणबाजी करत आहेत. मुळात त्यांना या खात्यात स्वारस्य नव्हते, हे महाराष्ट्राने शपथविधीच्या दुसऱ्या दिवशीच पाहिले आहे. मदत, पुनवर्सन खाते न मिळाल्याने वडेट्टीवार पदभार न घेता रूसून बसले होते.  राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया त्यांनी वर्षभरापुर्वीच सुरू करायला हवी होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून वादग्रस्त विधाने करत राहिले.

चार महिन्यांपुर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी आयोग स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या. त्यातही गांभिर्याचा अभाव स्पष्टपणे दिसला. अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्तींची जागा असलेल्या आयोगावर वडेट्टीवार यांनी पुर्णतः राजकीय व्यक्तींची वर्णी लावलेली आहे.  हे करत असताना कागदपत्रांची तपासणीही केलेली नाही. या संविधानिक अधिकार असलेल्या आयोगावरील नियुक्त्या असंविधानिक पद्धतीने झालेल्या आहेत. त्यामुळे अनेक वकुब नसलेले लोक आयोगावर गेलेले आहेत.

पूर्णवेळ राजकारणी असलेल्या प्राचार्य बबनराव तायवाडे यांना आयोगावर समाजशास्रज्ञ म्हणून नेमलेले आहे. तायवाडे यांचे शिक्षण कॉमर्स शाखेचे, मग ते समाजशास्रज्ञ कसे होऊ शकतात?  मात्र ते काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस असल्याने त्यांना समाजशास्रज्ञ बनविण्यात आले. तायवाडे यांनी दोन निवडणुका नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवल्या आहेत. इतके ते राजकारणातील बडे प्रस्थ आहे. त्यांचे वयही ६५ च्या पुढे आहे. त्यांची स्वतःची संघटना आहे, तरीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. तायवाडे यांना समाजशास्रज्ञ ठरविताना काय निकष लावले, याचा खुलासा वडेट्टीवार यांनी करायला पाहिजे.

या आयोगावार लक्ष्मण हाके यांना सदस्य करण्यात आले आहे. हाके यांनी पाच सहा महिने वडेट्टीवार यांच्या मागेपुढे करून हे पद मिळवले. हाके हे बोगस प्राध्यापक आहेत. त्यांनी शासनाला दिलेल्या परिचयपत्रात पीएच.डी झाल्याचे लिहले आहे.  वस्तुतः हाके यांच्याकडे कोणताही संशोधनाचा अनुभव नाही. वडेट्टीवारांच्या सोबतचे फोटो हाच त्यांचा बायोडेटा आहे.

मुळात हाके यांनी शासनाला फसविण्याचे गुन्हेगारी कृत्य केले आहे. मात्र वडेट्टीवारांनाच बोगस प्राध्यापकाला संधी द्यायची असल्याने त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली नाहीत. हाके हे पुर्णपणे राजकीय कार्यकर्ते असून त्यांनी दोन विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत.  हाके यांच्या नियुक्तीमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला तडा गेलेला आहे, असा आरोप ढोणे यांनी केला.

वडेट्टीवारांनी आयोगाचा वापर राजकीय पुर्वसनासाठी केलेला स्पष्टपणे दिसतो आहे असे सांगून ढोणे म्हणाले,  तायवाडे हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत, तर हाके हे वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहेत.  अॅड. चंद्रलाल मेश्राम यांनाही वडेट्टीवारांनी आयोगावर सदस्य म्हणून घेतलेले आहे. मेश्राम हे पासष्टी ओलांडलेले आहेत. त्यांनी २०१९ साली वडेट्टीवार निवडून आलेल्या ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर)  विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेली आहे.  त्यांना स्वतःच्या बाजूने घेण्याच्या भुमिकेतून मेश्राम आयोगाचे सदस्य बनलेले आहेत.

Backward Classes Commission scam by Vijay Vadettiwar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात