माणुसकीला काळिमा : 15 हजारांसाठी तब्बल 75 दिवस कोविड रुग्णाचा मृतदेह फ्रीझरमध्ये, आता झाले अंत्यसंस्कार

deceased corona patients body cremated after 75 days in Hapur uttar pradesh

corona patients body cremated after 75 days : उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात कोरोनाचा कहर अजूनही पाहायला मिळत आहे. ताजी घटना हापूडच्या शहर परिसरातील आहे. येथे 15 हजार रुपये नसल्याने एका कोरोना रुग्णाच्या पार्थिवावर गुरुवारी तब्बल अडीच महिन्यांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. deceased corona patients body cremated after 75 days in Hapur uttar pradesh


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात कोरोनाचा कहर अजूनही पाहायला मिळत आहे. ताजी घटना हापूडच्या शहर परिसरातील आहे. येथे 15 हजार रुपये नसल्याने एका कोरोना रुग्णाच्या पार्थिवावर गुरुवारी तब्बल अडीच महिन्यांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत तरुण एप्रिल महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. त्यादरम्यान मेरठला उपचार सुरू करण्यात आले. मेरठमध्ये उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्या व्यक्तीच्या पत्नीला रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, 15 हजार रुपये दिल्यानंतरच अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सोपवण्यात येईल. अन्यथा आम्ही अंत्यसंस्कार करू.

यानंतर पत्नीने हापुडमध्ये पैशांची व्यवस्था जंगजंग पछाडले, परंतु मृतदेहासाठी तिला 15 हजार रुपयांची जमवताआले नाहीत. यामुळे ती पुन्हा रुग्णालयात गेली नाही. हापूरमधून ती आपल्या दोन मुलांसह तिच्या गावी गेली. आता जवळपास अडीच महिन्यांनंतर रुग्णालयाला मृतदेहाची आठवण आली. यानंतर नातेवाइकांच्या प्रतीक्षेसाठी रुग्णालयाने मृतदेह ठेवला होता.

अडीच महिन्यांनंतरही कोणीही मृतदेह घ्यायला आले नाही, तेव्हा मेरठ हॉस्पिटलने हा मृतदेह हापूड आरोग्य विभागाकडे सोपविला आणि हापूड आरोग्य विभागाने मृतदेह तीन दिवसांपूर्वी जीएस मेडिकल कॉलेजमध्ये ठेवला. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने कुटुंबातील सदस्यांचा शोध सुरू करण्यात आला. गुरुवारी नातेवाईकांची माहिती मिळताच तो मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणात हापूडचे आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश खत्री म्हणाले की, मृताच्या भावाला मेरठच्या रुग्णालयातून पॉझिटिव्ह आल्याबद्दल सांगितले गेले होते, परंतु हे ऐकून तो पळून गेला आणि तेव्हापासून त्याचा मोबाइलदेखील बंद आहे. आता मृताच्या घरमालकाच्या माध्यमातून मृताच्या पत्नीला शोधून काढल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृतदेहाचे अंत्यसंस्कारही एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून झाले आहेत.

परंतु मृताची निर्दोष मुले व पत्नी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी आले तेव्हा त्यांचे अश्रू थांबत नव्हते. पैशांअभावी मृतदेहच न देण्याच्या रुग्णालयाच्या भूमिकेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सहसा कोरोना रुग्णाचा मृतदेह जतन केला जात नाही, परंतु अडीच महिने मृतदेहावर अंत्यसंस्कारच न झाल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

deceased corona patients body cremated after 75 days in Hapur uttar pradesh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण