पहाटेच्या अंधारात पाकिस्तानी हेक्झाकॉप्टर ड्रोनचा भारतात प्रवेशाचा प्रयत्न, सतर्क बीएसएफ जवानांनी फायरिंग केल्याने माघारी परतले

Pakistani Drone Seen Near Border Trying To Cross IB In Arnia Sector In Jammu

Pakistani Drone : जम्मू विभागातील अरनिया सेक्टरमध्ये एका ड्रोनने सीमा पार करण्याचा प्रयत्न केला. सतर्क बीएसएफ जवानांनी ड्रोन खाली पाडण्यासाठी 20 ते 25 राउंड फायरिंग केली. जवानांनी केलेल्या कारवाईनंतर ड्रोन माघारी गेला आहे. पहाटे 4.25च्या सुमारास एक ड्रोन (हेक्साकॉप्टर) अरनिया सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमा पार करण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून बीएसएफच्या जवानांनी त्यावर गोळीबार केला. या गोळीबारामुळे ड्रोन माघारी गेला. Pakistani Drone Seen Near Border Trying To Cross IB In Arnia Sector In Jammu


विशेष प्रतिनिधी

जम्मू : जम्मू विभागातील अरनिया सेक्टरमध्ये एका ड्रोनने सीमा पार करण्याचा प्रयत्न केला. सतर्क बीएसएफ जवानांनी ड्रोन खाली पाडण्यासाठी 20 ते 25 राउंड फायरिंग केली. जवानांनी केलेल्या कारवाईनंतर ड्रोन माघारी गेला आहे. पहाटे 4.25च्या सुमारास एक ड्रोन (हेक्साकॉप्टर) अरनिया सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमा पार करण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून बीएसएफच्या जवानांनी त्यावर गोळीबार केला. या गोळीबारामुळे ड्रोन माघारी गेला.

हवाई दलाच्या स्टेशनवर हल्ला झाल्यानंतर चार दिवसांनंतर पुन्हा ड्रोन दिसला. बुधवारी रात्री 12.45 वाजता ड्रोनला एअरबेसवरून पाहण्यात आले. एनएसजी कमांडोंनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला, पण ड्रोन गायब झाला. हवाई दलाच्या प्रशासनाने तातडीने पोलिसांनाही याची माहिती दिली. जवळपासचे कोणीतरी हे चालवत असल्याचा प्रशासनाला संशय होता.

एसपी दक्षिण जम्मू दीपक धिंग्रा यांचे म्हणणे आहे की, माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. परंतु कोणताही सुगावा लागलेला नाही. माहिती मिळताच अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पहाटे तीन वाजेपर्यंत आसपासच्या भागात शोध घेण्यात आला.

पाकिस्तानमधून ड्रोन हल्ला करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हल्ला करणारे ड्रोन पाकिस्तानकडून पाठवले गेले असण्याचीही शक्यता आहे. यासाठी मकवाल सीमा हा मार्ग वापरलेला असू शकतो. एअरबेसजवळून लश्कर या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या एखाद्या दहशतवादी किंवा ओजी कर्मचाऱ्याने हे ड्रोन चालवले नाहीत ना, हेसुद्धा पडताळून पाहिले जात आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 27 जूनच्या हल्ल्यामागील कट पाकिस्तानमध्ये रचला गेला आहे, त्यामागे लश्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि आयएसआयचा हात आहेत. हा हल्ला स्वतःच लश्करने स्थापन केलेली आणखी एक संस्था ‘रेझिस्टंट फ्रंट’ (टीआरएफ) ने आखला आहे. टीआरएफनेच असे हल्ले करण्याचा कट रचल्याचे सांगितले जात आहे.

Pakistani Drone Seen Near Border Trying To Cross IB In Arnia Sector In Jammu

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात