संजय राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हायला नको होती, कितीही आपटा, जिंकणार आम्हीच!

Shiv Sena MP Sanjay Raut Criticizes BJP Over maharashtra assembly speaker election

maharashtra assembly speaker election : राज्यात 5 आणि 6 जुलैदरम्यान दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवड अद्याप बाकी आहे. अध्यक्षपदावर काँग्रेसने दावा केलेला असला, तरी आता विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, निवडणूक व्हायला नको हवी होती. परंतु कुणी कितीही आपटले तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार, जिंकणार तर आम्हीच, असा दावा त्यांनी केला आहे. Shiv Sena MP Sanjay Raut Criticizes BJP Over maharashtra assembly speaker election


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यात 5 आणि 6 जुलैदरम्यान दोनदिवसीय पावसाळी अधिवेशन होणार आहे. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची निवड अद्याप बाकी आहे. अध्यक्षपदावर काँग्रेसने दावा केलेला असला, तरी आता विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, निवडणूक व्हायला नको हवी होती. परंतु कुणी कितीही आपटले तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार, जिंकणार तर आम्हीच, असा दावा त्यांनी केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्रात आहे, त्याचे प्रश्न दिल्लीत विचारले जातात. याबाबत एकतर विधिमंडळ सचिव, संसदीय कार्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सांगू शकतील. मी अथॉरिटी नाही. याबाबतचं उत्तर मी देऊ शकत नाही. विधानसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याने ते पद रिक्त झालं. कोव्हिड काळात तिन्ही पक्षांच्या आमदारांना एकत्र करून निवडणूक घेणं हे सद्य:स्थितीत टाळायला हवं असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. ते योग्यच होतं. मात्र, आता निवडणूक आहे, तिन्ही पक्ष निर्णय घेतील. आज महाराष्ठ्राच्या कानाकोपऱ्यातून आमदार येणार आहेत. त्यांची टेस्ट केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. अशा परिस्थितीत एखादा आमदार बाहेर राहिला तर निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.

राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा सर्वांशी संवाद आहे. कोणी कितीही आपटली तरी विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार. विरोधकांनी निवडणूक टाळली, तर महाराष्ट्रावर उपकार होतील. जिंकणार तर आम्हीच, कितीही आरडाओरडा केला, कितीही संशयाचं वातावरण तयार केलं, तरीही विरोधी पक्षाला या निवडणुकीत यश मिळणार नाही. विरोधकांनी सामंजस्याने भूमिका घ्यायला हवी होती, असेही राऊत म्हणाले.

Shiv Sena MP Sanjay Raut Criticizes BJP Over maharashtra assembly speaker election

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात