मुंबईत आणखी एक बनावट कोरोना लसीकरण शिबीर उघडकीस, पाच जणांना अटक

Fake Vaccination Campaign in Mumbai, Police Arrested 5 people

Fake Vaccination : खासगी कंपनीसाठी बनावट कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी गुरुवारी आठ जणांविरोधात एफआयआर नोंदविली. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गेल्या महिन्यात मुंबईतील गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपन्यांसाठी बनावट कोरोना लसीकरण शिबिरांचे आयोजन करणार्‍या टोळीला आतापर्यंत या प्रकरणात एकूण 10 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. Fake Vaccination Campaign in Mumbai, Police Arrested 5 people


विशेष प्रतिनिधी

मुंबई : खासगी कंपनीसाठी बनावट कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी गुरुवारी आठ जणांविरोधात एफआयआर नोंदविली. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गेल्या महिन्यात मुंबईतील गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपन्यांसाठी बनावट कोरोना लसीकरण शिबिरांचे आयोजन करणार्‍या टोळीला आतापर्यंत या प्रकरणात एकूण 10 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

कंपनीच्या कर्मचार्‍यांना लस 1055 डोस दिले

पोलिस अधिकारी म्हणाले की, हे नवीन प्रकरण इंटर गोल्ड कंपनीसाठी बनावट लसीकरण शिबिरे आयोजित करण्याशी संबंधित आहे. एमआयडीसी अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, एप्रिल आणि मे महिन्यात आरोपींनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना बनावट लसीकरण शिबिरे घेऊन 1055 डोस दिले होते. परंतु त्यापैकी केवळ 48 जणांना लसीबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.

आरोपींनी लसीकरण शिबिरासाठी कंपनीकडून 2.60 लाख रुपये घेतले

या कंपनीला नंतर कळले की, आयोजकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून लसीकरण शिबिरासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. आरोपींनी लसीकरण शिबिरासाठी कंपनीकडून 2.60 लाख रुपये घेतले होते.

आठपैकी पाच आरोपींना अटक

एफआयआरमधील मुख्य आरोपी म्हणजे शिवम हॉस्पिटलचे डॉ. मनीष त्रिपाठी, अरविंद जाधव आणि पवन सिंह, अनुराग, करीम, नेहा शर्मा आणि रोशनी पटेल यांच्यासह आठ जण आहेत. डॉक्टर त्रिपाठी आणि इतर पाच आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

Fake Vaccination Campaign in Mumbai, Police Arrested 5 people

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण