Anganwadi Sevika Recruitment 2021 : सातवी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी, बाल विकास प्रकल्प जालनामार्फत अंगणवाडी सेविकांची भरती; 9 जुलैपर्यंत करा अर्ज

Anganwadi Sevika Recruitment 2021 in Jalna Ghansavangi Know How To apply

Anganwadi Sevika Recruitment 2021 : राज्यात कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचार्‍यांसह अंगणवाडी सेविकांचेही काम अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता बाल विकास प्रकल्प जालनामार्फत अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येत आहे. घराघरात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. ही नोकरभरती अंगणवाडी सेविका आणि मिनी सेविका या पदांसाठी होणार आहे. याबाबत अधिसूचनाही काढण्यात आली असून इच्छुक महिला उमेदवारांनी 9 जुलै 2021 पर्यंत ऑफलाइन माध्यमातून आपला अर्ज सादर करायचा आहे. Anganwadi Sevika Recruitment 2021 in Jalna Ghansavangi Know How To apply


विशेष प्रतिनिधी

जालना : राज्यात कोरोना महामारीच्या काळात आरोग्य कर्मचार्‍यांसह अंगणवाडी सेविकांचेही काम अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता बाल विकास प्रकल्प जालनामार्फत अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येत आहे. घराघरात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. ही नोकरभरती अंगणवाडी सेविका आणि मिनी सेविका या पदांसाठी होणार आहे. याबाबत अधिसूचनाही काढण्यात आली असून इच्छुक महिला उमेदवारांनी 9 जुलै 2021 पर्यंत ऑफलाइन माध्यमातून आपला अर्ज सादर करायचा आहे.

अंगणवाडी सेविका, मिनीसेविका, मदतनीस मिळून 18 जागांवर ही भरती होणार आहे. उमेदवार किमान सातवी अथवा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात जाणार आहे. उमेदवार किमान 21 वर्षे तर कमाल 30 वर्षे वयाच्या असणं गरजेचं आहे. उमेदवारांनी आपले अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती कार्यालय, घनसावंगी या पत्त्यावर पाठवावेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या टास्क फोर्सने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्यासोबत ऑनलाइन माध्यमातून चर्चा केली आहे. राज्यातील संभाव्य तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असू शकते, असा अंदाज बांधताना त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी आणि जनजागृती करण्याचं मोलाचं काम अंगणवाडी सेविका करत आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात या अंगणवाडी सेविकांवरही कोरोना रोखण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

Anganwadi Sevika Recruitment 2021 in Jalna Ghansavangi Know How To apply

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात