राज्यपाल कोश्यारींच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंचे पत्रानेच उत्तर; अधिवेशन, अध्यक्षपद अन् ओबीसी आरक्षणावर दिले स्पष्टीकरण

CM Uddhav Thackeray Letter To Governor Koshyari on Assembly Session president and OBC Reservation

CM Uddhav Thackeray Letter To Governor Koshyari : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रानेच उत्तर दिलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं आपल्या पत्रात म्हटलं होतं. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्र पाठवून उत्तर दिलं आहे. CM Uddhav Thackeray Letter To Governor Koshyari on Assembly Session president and OBC Reservation


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रानेच उत्तर दिलं आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या असल्याचं आपल्या पत्रात म्हटलं होतं. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्र पाठवून उत्तर दिलं आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक, विधिमंडळ अधिवेशनाचा कार्यकाळ आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेऊन केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी तिन्ही मुद्द्यांवर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात लिहिलं की, केंद्राचे निर्देश आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळेच महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै असे दोन दिवसांचं घेण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही, त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे विचारविनिमयाने हा निर्णय घेतला. कोरोनामुळे विधानसभेचं अधिवेशन जास्त काळ घेता आलं नाही. देशातील अनेक राज्यांत हीच परिस्थिती आहे. सध्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे कामकाज पाहत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनही त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. निवडणुकीअभावी घटनात्मक तरतुदींचा कोणताही भंग झालेला नाही. कोरोनाची परिस्थिती पाहून सर्व खबरदारी घेऊन अध्यक्ष निवडणूक पार पाडू. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जाहीर केली आहे. मात्र, आम्ही पंतप्रधानांची भेट घेऊन ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी घटनात्मक मार्ग काढण्याची विनंती केली आहे. आपणही पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा आणि समाजाला न्याया मिळवून द्यावा. तसंच इम्पिरिकल डाटा मिळवून देण्यासाठीही केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी विनंती करतोय, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

CM Uddhav Thackeray Letter To Governor Koshyari on Assembly Session president and OBC Reservation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात