अगाध ज्ञानाच्या बळावर, पी. चिदंबरम पडले तोंडावर…!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी देशभरात मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची घोषणा केली आणि आपल्या हातातून महत्त्वाचा मुद्दा निसटला म्हणून सगळे विरोधक सैरभैर झाले. यातलेच एक नेते पी. चिदंबरम निघाले. covid vaccine procurment; I was wrong. I stand corrected, says p. chidambaram

त्यांनी आपली पाजळण्यासाठी एएनआय वृत्तसंस्थेला उद्देशून एक ट्विट केले, की एएनआय वृत्तसंस्था, कृपया मला सांगा… असे कोणत्या राज्य सरकारने मागणी केली आहे, की कोरोना प्रतिबंधक लस थेट त्यांनाच मिळावी… हे ट्विट करण्यामागचा चिदंबरम यांचा हेतू साफ होता… एएनआयने उत्तर देताच पंतप्रधान मोदींवर आणि भाजपवर शेरेबाजी करून घ्यायची. पण नेमका तोच डाव फसला… आणि तो एएनआय वृत्तसंस्थेने नाही फसविला. तो फसविला एका सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्टने… त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना लिहिलेले पत्रच सोशल मीडियावर सादर केले. या पत्रातून ममतांनी पंतप्रधानांकडे राज्यांना कोरोना प्रतिबंधक लस थेट मिळवू देण्याची मागणी केली आहे.

हे पत्र सोशल मीडियावर दिसताच चिदंबरम यांना माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता… मग त्यांनी उच्च भूमिका घेत आपण चुकल्याचे ट्विट केले… पण तोपर्यंत व्हायची ती टीका टिपण्णी झालीच होती. भाजप नेत्यांनी या ट्विटच्या निमित्ताने चिदंबरम यांची खिल्ली उडवून घेतली. त्यातही त्यांनी ममता बॅनर्जींसोबत काँग्रेस नेते आनंद शर्मा, डी. के. शिवकुमार आणि दस्तुरखुद्द राहुल गांधी यांची नावे घेऊन चिदंबरम यांना त्यांच्या मागण्या ऐकवल्या.

अशा प्रकारे चिदंबरम स्वतःचे अगाध ज्ञान पाजळायला गेले आणि अखेर तोंडावर आपटले…!! त्याची ही छोटीशी कहाणी.

covid vaccine procurment; I was wrong. I stand corrected, says p. chidambaram

महत्त्वाच्या बातम्या