कोरोनावरील कोवोवॅक्स लशीची मुलांवर चाचणी, आतापर्यंत तीन जणांना डोस


विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोनावरील कोवोवॅक्स लशीची लहान मुलांवरील चाचणी महापालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयात सुरू झाली आहे. २ ते १७ वर्षे वयोगटातील तीन मुलांना आतापर्यंत ही लस देण्यात आली असून पुढील सहा महिने ९२० मुलांवर या लशीची चाचणी करण्यात येणार आहे. त्यातील ४६० मुले २ ते ११ वयोगटातील; तर ४६० मुले १२ ते १७ वयोगटातील असतील.Covax started for children also

ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, अमेरिकेतील ३०,००० मुलांवर कोवोवॅक्सची चाचणी करण्यात आली आहे. त्यात कोणालाही दुष्परिणाम झालेला नसल्याचे या देशांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नायर रुग्णालयातही लशीची चाचणी करण्यात येत आहे.आतापर्यंत तीन मुलांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस २१ दिवसांनी दिला जाणार आहे. २१, ३६ आणि १८० दिवसांनी मुलांमधील अँटिबॉडीज तपासली जाणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ‘कोवोवॅक्स’ लशीची निर्मिती केली आहे.

मुलांसाठी ‘कोवोवॅक्स’ लस कितपत सुरक्षित आहे आणि लस घेतल्यानंतर किती प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, हे तपासण्यासाठी २० वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये या लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या होणार आहेत. यात २० पैकी आठ रुग्णालये महाराष्ट्रातील आहेत.

Covax started for children also

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय