कोरोनावरील उपचारात चक्क गंगाजल उपयुक्त, बनारस हिंदू विद्यापीठाचे संशोधन


विशेष प्रतिनिधी

अलाहाबाद : कोरोनावर प्रतिबंधक लस आली असली तरी अद्याप उपचार नाहीत. संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ त्यासाठी संशोधन करत आहेत. हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेले गंगाजल कोरोना उपचारात प्रभावी असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.Gangajal is useful in the treatment of corona, research of Banaras Hindu University

गंगा नदीचे पाणी अत्यंत पवित्र असल्याचे मानले जाते. बनारस हिंदू विद्यापीठातील डॉक्टर व्ही. एन. मिश्रा आणि डॉक्टर अभिषेक पाठक यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये गंगाजल हे कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याची माहिती दिली आहे. गंगा नदीच्या पाण्यात बॅक्टेरियोफेज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. बॅक्टेरियोफेजचा अर्थ बॅक्टेरिया नष्ट करणारा असा होतो.



गंगाजलामध्ये असलेले हे बॅक्टेरियोफेजही विविध प्रकारच्या व्हायरसना नष्ट करू शकतात. यामुळेच गंगा नदीची शुद्धता कायम राहते. गंगा नदीमध्ये जवळपास 1300 प्रकारचे बॅक्टेरियोफेज आढळून आले आहेत. देशातील कोणत्याही नदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅक्टेरियोफेज नाहीत. विशेष म्हणजे बॅक्टेरियोफेज आपल्यासाठी हानिकारक नसतात.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता यांनी जल शक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या स्वच्छ गंगा मिशनने या क्लिनिकल स्टडीबाबत निर्देश दिले होते. या अंतर्गत कोरोनावरच्या उपचारांसाठी गंगाजलाचा वापर करता येईल का याबाबत संशोधन सुरू आहे. गुप्ता यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल केली आहे.

त्यावर केंद्र सरकारने आरोग्य विभागाला एक नोटीस जारी केली आहे. काही महिन्यांपूर्वी ऋषीकेशपासून वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली होती. तपासणीत गंगेच्या पाण्यात कोठेही कोरोना व्हायरस आढळून आला नाही.

बंगळुरूच्या आयआयएममधील एक निवृत्त प्राध्यापक एका एनजीओसोबत मिळून गंगाजलापासून कोरोनावरील औषध तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रामुख्याने बॅक्टेरियोफेजवर संशोधन करत आहेत. कोरोनाच्या काही रुग्णांवर याची चाचणीही करण्यात येत आहे. गंगाजलचा प्रयोग यशस्वी झाल्यास, गंगाजलच्या मदतीने कोट्यवधी लोकांचा उपचार करणं शक्य होणार आहे.

हिंदू संस्कृतीत गंगाजलाने असाध्य रोगही बरे होतात असे म्हटले जाते. तज्ज्ञ कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर करता येईल का यादृष्टीने विचार करत आहेत.सध्या देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे.

Gangajal is useful in the treatment of corona, research of Banaras Hindu University

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात