देशात आठवड्यात एक विश्वविद्यालय सुरु, गेल्या सात वर्षातील चित्र; केंद्र सरकारचे शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याचा परिणाम


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारने शिक्षणाला प्रोत्साहन दिल्यामुळे गेल्या सात वर्षात आठवड्याला एक विश्वविद्यालय सुरू झाले आहे. केवळ विश्वविद्यालयात नव्हे तर महाविद्यालयांची संख्याही देशात वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.In Country one university a week, the picture of the last seven years; The result of the central government’s promotion to education policy

केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्राचा विकास व्हावा, तरुणांना शिक्षणाची चांगली संधी मिळावी, या हेतूने गेल्या वर्षी राष्ट्रीय शिक्षण नीती लागू केली. पण, त्यापूर्वीच शिक्षण क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. केंद्राच्या या प्रोत्साहनामुळे शिक्षण क्षेत्राला अच्छे दिन आल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या सात वर्षात आठवड्याला सरासरी एक विश्वविद्यालय सुरु झाले आहे.

२०१३-१४ मध्ये ७२३ विश्वविद्यालये होती. परंतु २०१९- २०२० मध्ये त्यांची संख्या १ हजार ४३ वर पोचली. याच याकाळात ३२० नवी विश्वविद्यालये सुरु झाली. विशेष म्हणजे उच्च शिक्षणाच प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढली आहे. सात वर्षात देशात दिवसाला सरासरी दोन नवी महाविद्यालये सुरु झाली आहेत. २०१३-१४ मध्ये ३६ हजार ६३४ महाविद्यालये होती. ती २०१९- २० मध्ये ४२ हजार ३४३ एवढी झाली. आयआयटी आणि आयआयएम च्या संख्येत वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशात १६ आयआयटी होत्या. आता त्यांची संख्या २३ झाली. आयआयएमची संख्या १३ वरून वाढून २० झाली.

शाळा, महाविद्यालये आणि विश्वविद्यालयाच्या नुसत्या इमारती उभ्या राहिल्या नसून त्यांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे महत्वाचे काम केंद्र सरकारने केले. त्यामध्ये पाणी, वीज, ग्रंथालय, वाचनालय आदीचा समावेश आहे. २०१४ मध्ये ५५ टक्के शाळांमध्ये वीज होती. आता हे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोचले आहे. अन्य सुविधाचे प्रमाण ८४ टक्के आहे. २०१४ च्या तुलनेत हे प्रमाण १५ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय शिक्षक आणि विद्यार्थी यांचे प्रमाण सुद्धा बदलले आहे. २०१४ मध्ये ३४ विद्यार्थामागे एक शिक्षक होता. आता २६ विद्यार्थाना एक शिक्षक शिकवतो. पर्यायाने शिक्षकांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होते.

प्राथमिक शिक्षण प्रणाली सुधारली असून एक शिक्षक आता १८ मुलांना शिकवतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थावर लक्ष देणे त्याला शक्य होत आहे. पर्यायाने मुले अधिक हुशार होण्यास मदत मिळत आहे. शाळांमधील शिक्षक भरतीही वेगाने सुरु झाली आहे. अजूनही शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्या तरी शाळांमध्ये हॅंडवॉश आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तयार केली आहेत. आता ९७ टक्के शाळांत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे.

शिक्षणातील प्रगतीचा आलेख उंचावला

  •  दिवसाला दोन महाविद्यालये सुरु होतात
  •  ८३ टक्के शाळेत वीजपुरवठा, पायाभूत सुविधा
  • ८४ टक्के शाळेत ग्रंथालय आणि वाचनालय सुरु

In Country one university a week, the picture of the last seven years; The result of the central government’s promotion to education policy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात