कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये ४० हजार जणांना कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था

तिरुअनंपुरम : कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये ४० हजार जणांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये टेन्शन वाढल आहे. CoronaVirus Over 40000 Corona cases found who have been vaccinated in kerala

केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारची चिंता वाढत आहे. अशातच, ज्या लोकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत, अशांनाही कोरोनाची लागण होत आहे. एक रिपोर्टनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे, की केरळमध्ये जवळपास ४० हजार कोरोना रुग्ण असे आहेत, ज्यांचे संपूर्ण लसीकरण झाले असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली.



केरळमधील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेत, केंद्र सरकारने केरळ सरकारकडून अशा सर्व संक्रमित रुग्णांची जीनोम सिक्वेंसिंग मागवली आहे. हे सॅम्पल कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णांशी जुळवले जातील. लस घेतलेली असतानाही येथे लोक कोरोना संक्रमित का होत आहेत, याचा अभ्यास केला जात आहे. मात्र, हा डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम आहे का ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे अधिकांश रुग्ण येथील पथानामथिट्टा जिल्ह्यात आढळले आहेत.

केरळमध्ये आढळले सर्वाधिक नवे रुग्ण

केरळमध्ये मंगळवारी २१,२१९ नवे कोरोना रुग्ण आढळले. एकूण संक्रमितांचा आकडा ३५,८६,६९३ वर पोचला आहे. राज्यातील संक्रमणदर १६ टक्क्यांजवळ पोचला आहे. येथे गेल्या एक दिवसात कोरोनामुळे १५२ लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील मृतांची संख्या आता १८००४ झाली आहे. सोमवारपासून आतापर्यंत १८४९३ रुग्ण संक्रमणमुक्त झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता ३३, ९६,१८ झाली आहे.

CoronaVirus Over 40000 Corona cases found who have been vaccinated in kerala

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात