गुजरातमध्ये कोरोना संसर्ग अधिक बिकट, वलसाड़च्या रुग्णालयात मृतदेहांचा लागला ढीग


विशेष प्रतिनिधी 

वलसाड : कोरोनाने देशातील अनेक शहरांत अक्षरशः थैमान घातले असून तेथील परिस्थीती आटोक्याबाहेर जात आहे. गुजरातमध्ये वलसाडमधील सरकारी रुग्णालयाच्या शवागारामध्ये मृतदेहांचा अक्षरश ढीग लागला आहे. अनेक मृतदेहांवर वेळेवर अंत्यसंस्कार होत नसल्याने त्यांची दुर्गंधी पसरू लागली आहे.Corona condition become very pity in Gujarat

रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने यंत्रणेवरील कामाचा ताण देखील वाढला आहे. मृतदेह कोरोना वॉर्डातून शवागारापर्यंत नेण्याच्या कामासाठी देखील बाहेरील मनुष्यबळाची मदत घेण्यात आली आहे. येथे मृतांच्या नातेवाइकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी ३६ सात प्रतिक्षा करावी लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.



काही मृतदेहांवर मागील तीन तीन दिवसांपासून अंत्यसंस्कार झालेले नाहीत. स्थानिक प्रशासनाने येथील संसर्ग रोखण्यासाठी चारशे बेडची नव्याने सुविधा केली होती पण ती देखील आता अपुरी पडू लागली आहे. अनेक रुग्ण हे गंभीर अवस्थेतच रुग्णालयामध्ये येऊ लागल्याने मृत्यूदर वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Corona condition become very pity in Gujarat

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात