WATCH Huge rush to buy alcohol Before Delhi lockdown, woman says, alcohol will help than Injection

WATCH : लॉकडाऊनच्या आधी दिल्लीत दारूसाठी झुंबड, महिला म्हणते – ‘इंजेक्शननं काही होत नाही, दारूनं होईल फायदा!’

Delhi lockdown : देशाच्या राजधानीत कोरोना संक्रमणात वाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज रात्री दहा वाजेपासून सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर दिल्लीत दारू दुकानांवर मद्यप्रेमींची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. लॉकडाउनची बातमीने मद्यप्रेमी प्रचंड अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीकरांनी नजीकच्या वाईन शॉपवर प्रचंड गर्दी केली. अनेक दुकानांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंग तर नव्हतीच, अनेकांच्या तोंडावर मास्कही नव्हता. WATCH Huge rush to buy alcohol Before Delhi lockdown, woman says, alcohol will help than Injection


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत कोरोना संक्रमणात वाढ झाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आज रात्री दहा वाजेपासून सहा दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर दिल्लीत दारू दुकानांवर मद्यप्रेमींची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. लॉकडाउनची बातमीने मद्यप्रेमी प्रचंड अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीकरांनी नजीकच्या वाईन शॉपवर प्रचंड गर्दी केली. अनेक दुकानांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंग तर नव्हतीच, अनेकांच्या तोंडावर मास्कही नव्हता.

दिल्लीच्या खान मार्केट परिसरात वृत्तसंस्था एएनआयने दारू दुकानांबाहेरील अलोट गर्दी टिपली आहे. जो-तो मद्याचा साठा करण्यासाठी धडपडत असताना यावेळी दिसून आला. याचदरम्यान, शिवपुरी गीता कॉलनीमध्ये एका वाइन शॉपबाहेर मद्य खरेदीसाठी आलेली एक महिला एएनआयला म्हणाली की, इंजेक्शनचा फायदा होणार नाही, ही दारू मात्र फायदा करेल. मला औषधांनी फरक पडणार नही, पेगने फरक पडेल.

दरम्यान, आज रात्री ठीक दहा वाजेपासून दिल्लीत लॉकडाऊनची सुरुवात होणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील. यादरम्यान सर्व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे. अन्नपदार्थांची दुकाने, मेडिकल आणि लग्न समारंभांनाही अटींसह परवानगी आहे. लग्न समारंभात केवळ 50 जणांना एंट्री आहे. यासाठी पास जारी करण्यात येणार आहेत. सीएम केजरीवाल म्हणाले की, मागच्या दोन ते तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये दररोज 25 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जनतेनेही कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

WATCH Huge rush to buy alcohol Before Delhi lockdown, woman says, alcohol will help than Injection

महत्त्वाच्या बातम्या