गुजरातमध्ये कोरोनाचे भयावह चित्र, अहमदाबादेत शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा

Horrible picture of Corona in Gujarat, queues of ambulances outside a government hospital in Ahmedabad

Corona in Gujarat : कोरोना संसर्गामुळे गुजरातमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत असताना मृत्युदरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आरोग्य सेवेवर मोठा ताण आला असून, गंभीर रुग्णांसाठी रुग्णालयाबाहेरचा वेटिंग टाइमही वाढला आहे. Horrible picture of Corona in Gujarat, queues of ambulances outside a government hospital in Ahmedabad


वृत्तसंस्था

अहमदाबाद : कोरोना संसर्गामुळे गुजरातमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत असताना मृत्युदरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आरोग्य सेवेवर मोठा ताण आला असून, गंभीर रुग्णांसाठी रुग्णालयाबाहेरचा वेटिंग टाइमही वाढला आहे.

अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. येथे रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून आपत्कालीन सेवेत येणार्‍या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यातील बहुतेक कोविड-19 चे रुग्ण आहेत. यामुळे अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी 60 रुग्णवाहिका वाढविण्यात आल्या आहेत.

विजय रूपाणी म्हणाले- परिस्थिती नियंत्रणात…

गुजरातमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी पुरेसे असल्याचे सांगितले आहेत. ते म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकारकडून कोणतीही चूक झाली नाही. आम्ही गेल्या एक वर्षापासून कोरोनाविरुद्ध सातत्याने लढा देत आहोत. मंगळवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सीएम विजय रूपाणी म्हणाले की, गुजरातमध्ये सर्वाधिक 70 टक्के रुग्ण अहमदाबाद, सुरत, राजकोटसह चार महानगरांतून समोर येत आहेत.

ते म्हणाले की, सोमवारी गुजरातमध्ये सहा हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु संसर्गाची शृंखला खंडित करण्यासाठी आम्ही वैद्यकीय सुविधा वाढविली आहे. आगामी काळात गुजरातमधील कोरोनाचा संसर्ग कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Horrible picture of Corona in Gujarat, queues of ambulances outside a government hospital in Ahmedabad

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण