धर्मांतर रॅकेट : उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतर कनेक्शन थेट महाराष्ट्रात! कुणाल चौधरी निघाला अतिफ ; बीडनंतर नाशिकमध्ये उत्तर प्रदेश ATS ची कारवाई


बँक खात्यामध्ये कोट्यवधी रुपये आल्याची माहिती : कुणाल चौधरी नाव धारण करून तो वास्तव्य करत होता…


वृत्तसंस्था

नाशिक : उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे. आतिफ उर्फ कुणाल नावाच्या व्यक्तीला नाशिक रोडच्या आनंद नगर भागातून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे. Conversion racket: Conversion connection in Uttar Pradesh directly in Maharashtra! Kunal Chaudhary is Atif; Action of Uttar Pradesh ATS in Nashik after Beed

अतिफ उर्फ कुणाल चौधरी असं आरोपीचं नाव आहे. तो कुणाल चौधरी या नावानेच परिसरात वास्तव्य करत होता. उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी त्याला नाशिकमधील आनंद नगर परिसरातून अटक केली.



उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिलेल्या माहितीप्रमाणे अतिफ धर्मांतर रॅकेट प्रकरणात मौलाना कलीम सिद्दीकीशी जोडलेला होता. मागील दोन वर्षांपासून तो संपर्कात होता. मौलाना कलीम सिद्दीकीला गेल्या आठवड्यात एटीएसने अटक केली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अतिफने रशियातून वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो रशियातून परतला. भारतात वैद्यकीय प्रॅक्टीस केलेली नसल्यानं तो भारतीय वैद्यकीय परिषदेकडून (MCI) घेतल्या जाणाऱ्या परीक्षासाठी तो पात्र ठरला नाही. त्यानंतर अतिफने नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे रुग्णांवर उपचार करणे सुरू केलेलं होतं.

अतिफने त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णाचं इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी मन परिवर्तन करण्याचं काम सुरू केलेलं होतं, असा दावा एटीएसकडून करण्यात आला आहे. अतिफच्या विविध बँक खात्यांत परदेशातून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तो धर्मांतराचं काम करायचा असंही एटीएसने म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश एटीएसने जून २०२१ मध्ये धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. हे रॅकेट देशपातळीवर काम करत असल्याचा दावाही एटीएसने त्यावेळी केला होता. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काजी जहांगीर कासमी या दोन मौलानांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर धर्मांतर प्रकरणात बीडमधून एका संशयिताला अटक करण्यात आली होती. इरफान शेख असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक करण्यात आली.

Conversion racket: Conversion connection in Uttar Pradesh directly in Maharashtra! Kunal Chaudhary is Atif; Action of Uttar Pradesh ATS in Nashik after Beed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात