वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जुनी वाहने भांगारात (व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीवर ) काढण्याच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी गुजरातमध्ये परिषद आयोजित केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. Conference in Gujarat on Vehicle Scrapping Policy; Prime Minister Modi will guide
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या पुढाकाराने ही परिषद होत आहे. परिषदेत गुंतवणूकदार, उद्योगपती, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या वर्षी २६ जुलै लरोजी मोटार वाहन कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या १५ वर्षाहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे, अशी तरतूद केली होती. त्या दृष्टीने आजची ही परिषद महत्वाची मानली जात आहे.
सरकारी विभागाची वाहने म्हणजे सर्व मंत्रालयातील वाहनं, पोलिस, प्रशासनाकडून वापरण्यात येणारी वाहने, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इतर विभागामध्ये १५ वर्षाहून जुनी भंगारात काढण्यात येतील. तसे एसटी आणि बेस्टच्या बस, सार्वजनिक उद्योगांतील वाहनेही भंगारात काढण्यात येतील. भंगारात गेलेल्या जुन्या साहित्याचा पुनर्वापर करता येईल आणि त्यामुळे वाहनांच्या किंमतीत घट होईल. या धोरणांतर्गत केंद्र सरकार पाच वर्षात दोन हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App