मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत मिळेल कोरोनाची लस

CM Yogi big decision, everyone above 18 years of age will get free corona vaccine in UP

free corona vaccine in UP : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लसीकरणाची सुविधा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यात आले. पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाला पराभूत करण्यासाठी लस व्यवस्थापन, तसेच लसीकरणाचे व्यापक काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. CM Yogi big decision, everyone above 18 years of age will get free corona vaccine in UP


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लसीकरणाची सुविधा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानण्यात आले. पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाला पराभूत करण्यासाठी लस व्यवस्थापन, तसेच लसीकरणाचे व्यापक काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

लस मोफत देण्याच्या सूचना

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, म्हणूनच राज्य सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण देण्याचे निश्चित केले आहे. राज्य सरकार उपलब्ध स्रोतांच्या साहाय्याने लसीकरण मोहीम व्यापक करणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला पाहिजे. आपल्याला लसीकरण केंद्रे वाढवायची आहेत. ज्या वयोगटांसाठी लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, त्यांचा डेटा बेस तयार केला जाणे आवश्यक आहे. त्याच वेळी लसीच्या डोसची गरज लक्षात घेऊन उत्पादकांना त्याच्या सुरळीत पुरवठ्याचीही व्यवस्था करावी लागेल. लसींच्या कोल्ड चेनसह सुरक्षित साठवण आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यावरही त्यांनी भर दिला.

मंत्र्यांना जबाबदारी

बैठकीत कोरोना परिस्थितीवर सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीवन व रोजीरोटी या दोन्हींसाठी काम करत आहे. ते म्हणाले की, सर्व मंत्र्यांनी त्यांच्या अधीन असलेल्या जिल्ह्यातील कोविड उपचारांच्या स्थितीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि स्थानिक प्रशासनाला मार्गदर्शन करावे. मंत्र्यांनी नियमित आढावा घेऊन कोविड बेडची संख्या दुप्पट करण्यासाठी, ऑक्सिजनचा अखंड पुरवठा, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसह सर्व जीवरक्षक औषधांची सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत. ते म्हणाले की, मंत्र्यांनी रुग्णवाहिकांचे संचालन आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची स्थितीदेखील पाहावी. मास्कचा अनिवार्य वापर, कोविडपासून बचाव करण्यासाठी जनजागृती, कोरोना विलगीकरण केंद्रांचे कामकाज याविषयी जिल्हा प्रशासनाला आवश्यक मार्गदर्शक सूचना द्याव्यात.

कोरोनाला हरवण्याचा विश्वास

बाहेरून येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात क्वारंटाईन सेंटर चालविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. जनजागृती यंत्रणेद्वारे ग्रामीण व शहरी भागात जनजागृती करण्यास सांगितले गेले आहे. जनतेला जागरूक ठेवून आणि अफवा टाळून मागील वर्षीप्रमाणे राज्यात कोरोना साथीचा यशस्वी मुकाबला करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

CM Yogi big decision, everyone above 18 years of age will get free corona vaccine in UP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात