पश्चातबुध्दी : आधी सिध्दू मुसेवालाची सुरक्षा हटविली, हत्येनंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून तपासाचे मिनिट टू मिनिट मॉनिटरिंग


वृत्तसंस्था

चंडीगड – पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला याची पंजाबच्या आम आदमी पार्टीच्या सरकारने सुरक्षा हटविली आणि त्याची दुसऱ्याच दिवशी हत्या झाली… आता पश्चातबुध्दीने मुख्यमंत्री भगवंत मान हे सिध्दु मुसेवालाच्या हत्येच्या तपासाचे मिनिट टू मिनिट मॉनिटरिंग करीत आहेत. CM Bhagwant Mann is taking minute to minute updates on Sidhu Moose Wala murder case.

व्हीआयपी कल्चर हटविण्याच्या नावाखाली सिध्दु मुसेवाला याच्यासह पंजाबमधल्या तब्बल ४०० जणांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा निर्णय भगवंत मान यांच्या सरकारने घेतला. यामध्ये भारताचे माजी हॉकी कॅप्टन परगट सिंग यांच्या देखील समावेश आहे. पण व्हीआयपी कल्चर हटविण्याच्या नावाखाली भगवंत मान सरकार जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे दुसऱ्याच दिवशी सिध्द झाले. सिध्दु मुसेवाला याची गुंड टोळीने हत्या केली. त्यांचे कनेक्शन कॅनडातील फुटीरतावाद्यांशी आहे.

आणि आता मुख्यमंत्री भगवंत मान हे सिध्दु मुसेवाला याच्या हत्येच्या तपासाचे मिनिट टू मिनिट मॉनिटरिंग करीत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मनसा येथे तातडीने पाठविले आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यात येईल. मुख्यमंत्री कार्यालयाने खास ट्विट करून ही माहिती दिली आहे.

 

CM Bhagwant Mann is taking minute to minute updates on Sidhu Moose Wala murder case.

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात