अध्यात्मिक गुरुच्या सल्याने शेअर बाजार चालविणाऱ्या चित्रा रामकृष्णन, चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा गोष्टी सीबीआयच्या तपासात उघड


विशेष प्रतिनिधी

मुंबई : हिमालयात राहणाऱ्या एका कथित अज्ञात अध्यात्मिक गुरुच्या आदेशानुसार शेअर बाजार चालवल्याचा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्यावर आरोप आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा गोष्टी पुढे आल्या आहेत.चित्रा रामकृष्णन या ज्याला माहिती पाठवित तो ‘हिमालयन योगी’ दुसरा कोणी नसून नॅशनल स्टॉक एक्सेंजचा माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम होता. त्याच्याशी चित्रा रामकृष्ण यांनी ईमेलद्वारे संवाद साधला होत्या.Chitra Ramakrishnan who runs the stock market on the advice of a spiritual guru, A CBI probe has revealed things that would embarrass the story of the film

विशेष म्हणजे चित्रा यांना फसवून आनंद सुब्रमण्यम याने योगीच्या सूचनेवरून स्वत:चीच नियुक्ती करून घेतली होती. आनंद सुब्रमण्यन योगी असल्याचे एका ईमेल आयडीवरून उघड झाले, असे सीबीआयने म्हटले आहे. सुब्रमण्यन याने हा मेल आयडी तयार केल्याचे पुरावे असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.



चित्रा रामकृष्ण यांनी 2013 ते 2016 दरम्यान त्यांच्यामेल आयडीवरून गोपनीय माहिती शेअर केली. यापैकी काही मेल आनंद सुब्रमण्यन याच्या दुसºया मेल आयडीवर देखील पाठवण्यात आल्याची माहिती आहे. सुब्रमण्यनच्या मेल आयडीवरून या मेल्सचे स्क्रीनशॉट्स जप्त करण्यात आले आहेत. सुब्रमण्यनची सीबीआयने गेल्या आठवड्यात चार दिवस चौकशी केली होती. त्यांना काल रात्री 11 च्या सुमारास चेन्नई येथून अटक करण्यात आली.

सुब्रमण्यन यांनी प्रश्नांना उत्तरे देण्यात सहकार्य केले नाही; त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सुब्रमण्यन यांची 2013 मध्ये एनएसए मध्ये मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर चित्रा रामकृष्ण यांनी 2015 मध्ये ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून पदोन्नती केली होती. 2016 मध्ये, त्यानी अनियमिततेच्या आरोपांमुळे ठरए सोडले.

चित्रा रामकृष्ण यांची योगी सोबत गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल चौकशी सुरू आहे, हा योगी रामकृष्ण यांचा सहाय्यक असल्याचे पुढे आले आहे. सुब्रमण्यन यांची नियुक्ती आणि कामाच्या मूल्यांकनाचा कोणताही पुरावा नसताना त्यांच्या पगारात असलेली वारंवार, अनियंत्रित आणि असमान्य वाढ हा प्रकरणावरील अहवालाचा एक भाग होता. रएइक ने चित्रा रामकृष्ण आणि इतरांवर सुब्रमण्यन यांची नियुक्ती आणि त्यांच्या मोठ्या पदोन्नतीमध्ये कथित प्रशासकीय त्रुटी असल्याचा आरोप केला आहे.

इमेलच्या आधारे, रामकृष्णा या व्यक्तीला 2015 मध्ये अनेक वेळा भेटल्या होत्या. त्यांनी 2013 ते 2016 पर्यंत स्टॉक एक्स्चेंजचे नेतृत्व केले. रामकृष्णा यांनी सेबीला असेही सांगितले की त्यांनी ज्या ईमेलशी व्यवहार केला होता तो सिद्ध पुरुष/योगी जो कदाचित हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये राहतो याच्याद्वारे आॅपरेट केला होता. मी त्याला पवित्र ठिकाणी एकदा भेटले आहे. ज्याचे कोणतेही लोकेशन दिले नसल्याते त्यांनी सांगितले.

जेव्हा तिला विचारण्यात आले की, हिमालयात राहून, योगीला ईमेल कसे मिळू शकतात आणि नियमितपणे पत्रव्यवहार करू शकतो. यावर त्यांच्या अध्यात्मिक शक्तींसाठी त्यांना असे कोणतेही भौतिक गोष्टिंची आवश्यक नाही,” असे उत्तर रामकृष्णा दिले.

त्या योगीला आध्यात्मिक शक्ती असे म्हणत त्यांनी सेबीला सांगितले मी त्याला गंगेच्या काठावर जवळजवळ 20 वर्षांपूर्वी प्रत्यक्ष भेटले होते. त्यानंतर, अनेक वर्षांमध्ये मी अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींवर त्याचे मार्गदर्शन घेतले आहे. ते इच्छेनुसार प्रकट होतात आणि त्यांचे ठरवीक ठिकाण नसल्याने, मी त्यांना मार्ग विचारला जेणेकरुन मी जेव्हा-जेव्हा गरज वाटली तेव्हा मी त्याचे मार्गदर्शन घेऊ शकेन. त्यानुसार, त्याने मला एक आयडी दिला ज्यावर मी त्यांचा सल्ला घेऊ शकेल, असे रामकृष्णा यांनी सांगितले.

Chitra Ramakrishnan who runs the stock market on the advice of a spiritual guru, A CBI probe has revealed things that would embarrass the story of the film

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात