IT Raid : हिमालयीन योग्याच्या सल्ल्याने NSE चालवणाऱ्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणीत वाढ, प्राप्तिकराचे छापे सुरू

IT Raid Former CEO of National Stock Exchange Chitra Ram Krishna's problems escalate, income tax raids begin

IT Raid : मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. रामकृष्ण अलीकडेच SEBIच्या आदेशानंतर चर्चेत आहेत, ज्यात असे म्हटले आहे की त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांची एक्स्चेंजचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालक (MD)चे सल्लागार म्हणून हिमालयातील एका योगींच्या सांगण्यावरून नियुक्ती केली होती. IT Raid Former CEO of National Stock Exchange Chitra Ram Krishna’s problems escalate, income tax raids begin


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. रामकृष्ण अलीकडेच SEBIच्या आदेशानंतर चर्चेत आहेत, ज्यात असे म्हटले आहे की त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांची एक्स्चेंजचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालक (MD)चे सल्लागार म्हणून हिमालयातील एका योगींच्या सांगण्यावरून नियुक्ती केली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की छापेमारी त्यांच्या आणि इतरांविरुद्ध करचुकवेगिरी आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्याच्या उद्देशाने आहे. सेबीच्या आदेशात म्हटले आहे की, रामकृष्ण यांनी एनएसईच्या आर्थिक आणि व्यवसाय योजनांसह काही अंतर्गत गोपनीय माहिती योगी यांच्याशी शेअर केली आणि एक्सचेंजच्या कर्मचार्‍यांच्या कामगिरीच्या मूल्यांकनावर त्यांचा सल्लाही घेतला.

सेबीने रामकृष्ण आणि इतरांवर दंडही ठोठावला आहे. सुब्रमण्यन यांच्या नियुक्तीमध्ये सिक्युरिटीज कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. आनंद सुब्रमण्यन यांची समूहाचे कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) सल्लागार म्हणून नियुक्ती करताना सिक्युरिटीज कराराच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात नियामकाने हे पाऊल उचलले आहे.

3 वर्षे NSEच्या MD आणि CEO

चित्रा रामकृष्णा एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत NSEच्या MD आणि CEO होत्या. त्या योगींना शिरोमणी म्हणायच्या, त्यांच्या मते ते एक आध्यात्मिक शक्ती आहेत आणि गेली 20 वर्षे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींवर मार्गदर्शन करत आहेत. रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार, ही अज्ञात व्यक्ती किंवा योगी कथितरीत्या एक आध्यात्मिक शक्ती होती, जी त्यांना पाहिजे तेथे दिसू शकते.

IT Raid Former CEO of National Stock Exchange Chitra Ram Krishna’s problems escalate, income tax raids begin

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात