सामान्य पार्श्वभूमी असूनही योग्याप्रमाणे इच्छाशक्तीमुळे नरेंद्र मोदी पोहोचले उच्च पदावर, ज्येष्ठ लेखक रस्किन बॉँड यांनी केले कौतुक


सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येऊनही आपले राजकीय कौशल्य आणि योग्यासारख्या इच्छाशक्तीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उच्च स्थानावर पोहोचले असल्याचे कौतुक ज्येष्ठ लेखक रस्किन बॉँड यांनी केले आहे. पंडीत नेहरू हे लोकनेते होते, असेही त्यांनी म्हटले आहे.Nehru people’s man, PM Modi has Yogic will power, Ruskin Bond writes in n New Book


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येऊनही आपले राजकीय कौशल्य आणि योग्यासारख्या इच्छाशक्तीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उच्च स्थानावर पोहोचले असल्याचे कौतुक ज्येष्ठ लेखक रस्किन बॉँड यांनी केले आहे. पंडीत नेहरू हे लोकनेते होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या ८४ वर्षांपासून भारतात राहत मातृभूमी मानत असलेल्या बॉँड यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अ लिटल बुक ऑफ इंडिया: सेलिब्रेटिंग 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी भारतातील आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. त्याचबरोबर आजपर्यंतच्या पंतप्रधानांबाबतही लिहिले आहे. बॉँड यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत म्हटले आहे की, ते लोकांतील नेते होते. इंग्रजी पब्लिक स्कूल आणि जगातील सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांत त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर पाश्चिमात्य विचारांचा पगडाही होता. मात्र, दुसऱ्या बाजुला ते लोकनेतेही होते. त्यांना गर्दी आवडायची. याबाबतचा एक किस्सा त्यांनी सांगितला आहे. ते म्हणतात, १९६० च्या सुमारास पंडीत नेहरू यांचा एक अंगरक्षक मला भेटला होतो. तो म्हणाला मला नेहरूंसोबत राहणे कठीण झाले आहे. ते गर्दीच्या दिशेने धावत जातात. त्यामुळे मलाही त्यांच्यामागे पळावे लागते. यामुळे माझे वजन कमी पडले आहे. बॉँड म्हणात त्याला मी भेटलो तेव्हा त्याने अंगरक्षक म्हणून काम सोडले होते आणि वजन वाढविण्याचे याचे प्रयत्न सुरू होते.

नेहरूंना जागतिक घडामोडींचे ज्ञान होते. इंग्रजी भाषवर प्रभुत्व होते. त्यांची इंग्रजीतील भाषणे अत्यंत प्रभावी ठरत असे सांगतानाच बॉँड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले आहे. मोदी अत्यंत सामान्य परिस्थितीतून आले. त्यांना नेहरूंसारखी पार्श्वभूमी नव्हती. मात्र, राजकीय कौशल्य होते. त्याचबरोबर त्यांची इच्छाशक्ती एखाद्या योग्यासारखी पारलौकिक होते. त्यामुळेच ते आज यश मिळू शकले आहेत.


तिजोरी रिकामी करू पण लस घरोघरी पोहोचवू, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आमच्यासाठी देशवासियांचा जीव अनमोल


इंदिरा गांधी यांचा उल्लेख एक मजबूत नेत्या असा त्यांनी केला आहे. बॉँड म्हणात, पूर्व पाकिस्तानात बांग्ला देश निर्माण करण्यासाठी भारतीय सैन्य पाठविण्याच्या निर्णयाबाबत इंदिरा गांधी खंबीर होत्या. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अनेक महत्वाच्या घटना घडल्या. दोन वर्षे त्यांनी देशात आणिबाणी लागू केली होती. त्यामध्ये आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकले.

राजीव गांधी यांच्याविषयी बॉँड यांनी म्हटले आहे की त्यांना राजकीय समज फारशी नव्हती. मात्र, आपले शुभचिंतक आणि पत्नीच्या मदतीने त्यांनी देशासाठी खूप चांगले काम केले. मात्र, श्रीलंकेतील यादवी युध्दावर तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न दु:खदायी ठरला.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी बॉँड यांनी भरभरून लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधान होण्यापूर्वी काही वर्षे मी वाजपेयी यांना मसूरीच्या बाजारात फिरताना पाहिले होते. त्यांच्यासोबत एक-दोनच लोक होते. ते लोकांशी अत्यंत नैसर्गिकपणे कोणत्याही दिखाव्याशिवाय बोलत होते. भाजपाची सत्ता आल्यावर नम्रता, शिष्टाचार आणि लोकांना समजून घेण्याच्या गुणांमुळे ते एक वेगळे पंतप्रधान ठरले. त्यांना लोकांच्या आशा-आकांक्षांविषयी समज होती.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा रस्किन बॉँड हे सिमल येथील एका बोर्डींग स्कूलमध्ये शिकत होते. त्यांनी शाळेवरून युनियन जॅक उतरवून तिरंगा फडकाविण्याचा प्रसंगही सांगितला अहे. त्याचबरोबर भारतातील नद्या, जंगले, विविध ठिकाणांपासून ते साहित्य आणि संस्कृतीविषयी पुस्तकात लिहिले आहे. मात्र, पुस्तकाचा मुख्य आशय हा गेल्या ७५ वर्षांत भारताच्या झालेल्या प्रगतीचा आहे.

Nehru people’s man, PM Modi has Yogic will power, Ruskin Bond writes in n New Book

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात