पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली राधा स्वामी डेराच्या प्रमुखांची भेट


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : पंजाबमध्ये विविध डेराप्रमुखांचा लोकांमध्ये मोठा प्रभाव आहे. पंजाब निवडणुकीचय तोंडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डेरा ब्यास येथील राधा स्वामी डेराचे प्रमुख बाबा गुरिंदर सिंह ढिल्लों यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबाबतची माहिती अद्याप नसली तरी याचा निवडणुकीत मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.On the eve of Punjab Assembly elections, Home Minister Amit Shah called on the head of Radha Swami Dera

राधा स्वामी डेरा हा पंजाबमधील एक प्रमुख डेरा मानला जातो. त्यांना मानणारा मोठा भक्तवर्ग आहे. डेराच्या आदेशाने निवडणुकीत मतदानही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोट दौºयातून परतताना राधी स्वामी डेराला भेट देण्याची चर्चा होती. परंतु, त्यांच्या जागी अमित शहा यांनी तेथे भेट दिली.



राधा स्वामी डेराचे भक्तगण केवळ पंजाबमध्येच नाहीत तर देश-विदेशात सर्वत्र पसरलेले आहेत. बाबा जैमल सिंहयांनी 1891 मध्ये डेराची स्थापन केली. आजपर्यंत राधा स्वामी डेरा राजकारणापासून दूर राहिला आहे. मोठ्या प्रमाणावर समर्थक असतानाही हा डेरा निवडणुकीच्या काळात मौन धारण करणेच पसंद करतो.

मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी मुख्यमंत्री झाल्यावर दोन वेळा येथे भेट दिली होते. त्याचबरोबर भाजपाचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांनीही भेट दिली होती. माजी मंत्री विक्रम सिंह मजीठिया यांचाही या डेरावर चांगला प्रभाव आहे.

अमित शाह बुधवारी दुपारी अडीच वाजता डेरा स्थानी पोहोचले. सुमारे एक तास ते तेथे होते. यावेळी त्यांची डेराप्रमुखांशी पंजाबच्या राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकतीच दिल्लीमध्ये गुरिंदर सिंह ढिल्लों यांची भेट घेतली होती.

डेरा कधीही राजकारणात पाठिंबा जाहीर करत नसला तरी थेट पंतप्रधानांची डेराप्रमुखांनी भेट घेतल्याने राजकीय चर्चा सुरू झाली होती. आता अमित शाह यांच्या भेटीमुळे ही चर्चा वाढली आहे.पंजाबमध्ये भाजपा पहिल्यांदाच अकाली दलाशिवाय निवडणूक लढत आहे. या परिस्थितीत राधा स्वामी डेराने भाजपला पाठिंबा दिला तर त्याचा खूप फायदा भाजपला होणार आहे. डेरा ब्यासचा राज्यातील ११७ जागांवर चांगला प्रभाव आहे.

On the eve of Punjab Assembly elections, Home Minister Amit Shah called on the head of Radha Swami Dera

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात