अखिलेश यादव यांनी पोलीसांबाबत वापरले अपशब्द


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सपाला गुंडांचा पक्ष, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा गुंडाराज येईल असे मतदारांना वारंवार सभांमधून सांगत आहेत. त्यांच्या आरोपांना बळ मिळेल अशी कृती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. त्यांनी भर सभेत पोलीसांबाबत अपशब्द वापरले आहेत.Akhilesh Yadav used abusive words against the police

उत्तरप्रदेशच्या कन्नौजच्या तीर्वा मतदारसंघात अखिलेश यादव यांची सभा सुरु होती. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे सभा मंडपाच्या जवळ मोठ्या प्रमाणावर लोक उभे होते. त्यांना पोलीस मागे सारत होते. यावेळी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सभा सुरु होती. भाषण सुरु होते, त्यांचे लक्ष तिकडे गेले तेव्हा त्यांनी पोलिसांना चार पाच वेळा ए पोलीस, ए पोलीस असे म्हटले.



यानंतर त्यांच्यावर आपत्तीजनक टिप्पणी केली. ए पोलीस, ए पोलीस, ए पोलिसवाल्यांनो का करताय हा तमाशा? तुमच्यापेक्षा उद्धट कोणी असू शकत नाही. हे भाजपावाले करवून घेत असतील. भाजपाने रेड कार्ड इश्यू केलेले, आठवतेय का? एका जातीच्या अधिकाºयांची नियुक्ती केली होती.

Akhilesh Yadav used abusive words against the police

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात