HIJAB CONTROVERSY : भारतात हिजाब घालण्याची गरज नाही ! ज्यांच्या घरात बहिणीचं नातं नाही…कुणी कुणासोबतही लग्न करू शकतो ; त्यांनी घरात हिजाब घालावा-साध्वी प्रज्ञा सिंह


भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले की, मदरसा वगळता देशातील कोणत्याही शाळा/कॉलेजमध्ये हिजाब खपवून घेतला जाणार नाही.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतात हिजाब घालण्याची गरज नाही , असे भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, भारतात महिलांना देवी मानले जाते. त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. पण ज्यांच्या घरात बहिणीचं नातं नाही, ज्यांच्या घरात मावशी आणि मावशीची मुलगी सगळ्यांशी लग्न करू शकतात, त्यांनी घरात हिजाब घालावा.HIJAB CONTROVERSY: In whose house there is no sister’s relationship … where can marry everyone; Then you have to wear hijab at home; BJP MP Pragya Singh Thakur …

कर्नाटकातील हिजाब वादावरून देशभरात वातावरण तापलं आहे. अशात आता भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनीही यात उडी घेतली आहे. भारतात हिजाब घालण्याची गरज नाही. देशात कुठेही हिजाब घालण्याची गरज नाही. ज्या महिला आपल्याच घरात सुरक्षित नाहीत त्याच हिजाब घालतात. असं वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलं आहे. प्रज्ञा सिंग यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत

भोपाळच्या बरखेडा पठाणी परिसरातील एका मंदिरात आयोजित कार्यक्रमात खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर बोलत होत्या. तुमच्याकडे मदरसे आहेत. जर तुम्ही मदरशांमध्ये हिजाब किंवा खिजाब (केसांना लावण्यात येणार रंग) लावला तर आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही तिथे आवश्यक तो पोशाख घालता आणि त्यांच्या शिस्तीचे पालन करता.

पण देशातील शाळा-कॉलेजची शिस्त मोडून तुम्ही हिजाब घालून खिजाब लावणं सुरू केले, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा खासदार प्रज्ञा सिंग यांनी दिला.

आपल्यावर वाईट नजर ठेवणाऱ्यांपासून पडदा टाकला पाहिजे. म्हणून हिजाब घालायला हवा. पण हिंदूंची कुदृष्टी नाही. स्त्रियांची पूजा करणे ही सनातनची संस्कृती आहे. जेव्हा देवतांनाही गरज असते, तेव्हा दुष्टांचा वध करण्यासाठी देवीला आवाहन केले जाते. येथे माता आणि पत्नीचे स्थान सर्वोच्च आहे. जिथे महिलांना एवढी उंची आहे, तिथे हिजाब घालण्याची गरज आहे का? भारतात हिजाब घालण्याची गरज नाही, असे प्रज्ञा सिंग म्हणाल्या.

महाराष्ट्रात हिजाब प्रकरणावरून वेगवेगळ्या पक्षांची वेगळी मतं असूनसुध्दा कोणताही पक्ष या प्रकरणात रस्त्यावर उतरलेला नाही..

एकाबाजूला आदित्य ठाकरे यांनी हिजाब प्रकरणात युनिफॉर्मचं पालन केलं गेलं पाहिजे अशी भूमिका घेऊन शिवसेनेची भूमिका मांडलीय..

तर सुप्रिया सुळे आणि प्रियंका गांधी यांनी कोणी काय घालावं हा त्या महिलेचा अधिकार आहे अशी भूमिका मांडून एका पध्दतीने आंदोलन करणाऱ्या मुस्लिम विद्याथिर्नींचं समर्थन केलंय.

 

महाराष्ट्राच्या राजकारणात तटस्थ भूमिका घेणाऱ्या एमआयएमने मात्र महाराष्ट्रात रस्तायावर उतरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय.. याप्रकरणातून आघाडी सरकारमधील पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका लक्षात घेता एमएमआयएम हिजाब प्रकरणाचा फायदा घेण्याचा तर प्रयत्न करत नाहीये ना?एमआयएमने महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल भागांमध्ये आपलं अस्तित्व वाढवण्याचा गेल्या काही वर्षापासून प्रयत्न केलाय.

पण मालेगाव आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघ वगळता यात त्यांना फारसं यश मिळू शकलेलं नाही. तर आता भाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांनी हिजाबची गरज नाही असं म्हटलं आहे.

 

HIJAB CONTROVERSY: In whose house there is no sister’s relationship … where can marry everyone; Then you have to wear hijab at home; BJP MP Pragya Singh Thakur …

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण