Chinese President's letter to Prime Minister Modi, offered to help in the Corona crisis

चिनी राष्ट्राध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोना संकटात मदतीचा दिला प्रस्ताव

Corona crisis : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना भारतातील महामारीच्या उद्रेकावरून संवेदना जाहीर करत या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना भारतातील महामारीवरून संवेदना पाठवल्या आहेत. यासंदेशात शी जिनपिंग यांनी म्हटलंय की, या महामारीच्या संकटात भारताला समर्थन आणि मदत देण्याची चीनची इच्छा आहे. Chinese President’s letter to Prime Minister Modi, offered to help in the Corona crisis


विशेष प्रतिनिधी

बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना भारतातील महामारीच्या उद्रेकावरून संवेदना जाहीर करत या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआनुसार, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना भारतातील महामारीवरून संवेदना पाठवल्या आहेत. यासंदेशात शी जिनपिंग यांनी म्हटलंय की, या महामारीच्या संकटात भारताला समर्थन आणि मदत देण्याची चीनची इच्छा आहे.

एक दिवस आधीच चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी कोरोनाविरुद्ध युद्धात मदतीचे वचन देत म्हटले होते की, चीनमध्ये तयार झालेल्या कोरोनाविरुद्ध कामी येणाऱ्या वस्तू भारताला पाठवल्या जात आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात वांग म्हणाले होते की, भारतापुढे आलेल्या आव्हानांबद्दल चीनला सहानुभूती वाटते.

तथापि, चिनी मदत फक्त बोलाचीच कढी ठरते की काय, अशी शंका आहे. कारण काही दिवसांपूर्वीच भारतीय व्यावसायिकांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व इतर वैद्यकीय उपकरणे चीनमधून मागवली होती. ती चीनने पाठवण्यास नकार दिला होता. त्यांचे म्हणणे होते की, भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता पुढचे पंधरा दिवस येथील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दुसरीकडे, अनेक भारतीय व्यावसायिकांनी वैद्यकीय उत्पादनांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची चीनमधून आयात केली होती. त्यात त्यांना रसायनांच्या ऐवजी खडूची पावडर पाठवण्यात आली. याविषयी आता भारतीय व्यावसायिक आंतरराष्ट्रीय ग्राहक मंचात दाद मागणार आहेत. दुसरीकडे, जगभरातून भारताला या आपत्तीच्या काळात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यामुळेच केवळ दिखाव्यापुरता चीननेही तसा प्रस्ताव पाठवल्याची चर्चा सुरू आहे.

Chinese President’s letter to Prime Minister Modi, offered to help in the Corona crisis

महत्त्वाच्या बातम्या