सीमेवर चीन पुन्हा सक्रिय: लडाख सीमेवर तंबू ठोकले; आठ ठिकाणी लष्करी छावण्या, प्रत्येक ठिकाणी ८४ तंबू


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीन पुन्हा भारताच्या सीमेवर सक्रिय झाला आहे. १७ महिन्यांपूर्वी पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतर पुन्हा चीन सीमा रेषेवर सैन्यासाठी बंकर बांधत आहे. गुप्तचर अहवालानुसार, चीनने पूर्व लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) जवळपास आठ ठिकाणी नवीन मॉड्यूलर कंटेनर (तात्पुरते तंबू) उभारून सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.China reactivates on border: Tents pitched on Ladakh border; Military camps in eight places, 84 tents in each place

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मीने उत्तरेकडील काराकोरम खिंडीजवळील वहाब जिल्गापासून पियू, हॉट स्प्रिंग्स, चांगला, ताशीगोंग, मांजा आणि चुरूपपर्यंत सैनिकांसाठी तंबू बांधले आहेत. प्रत्येक ठिकाणी सात क्लस्टरमध्ये ८० ते ८४ तात्पुरते तंबू बनवले आहेत.



गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी चकमकीनंतर चीनने अनेक छावण्या उभारल्या आहेत. जुन्या व्यतिरिक्त या नवीन छावण्या बांधण्यात आल्या आहेत. याचा अर्थ एकच आहे की चीनचा सीमेवरून सैन्य मागे घेण्याचा कोणताही हेतू नाही.

दोन्ही देशांचे ५०- ५० हजार सैनिक सीमेवर तैनात आहे. दोन्ही देशांनी हे सैनिक पूर्व लडाखजवळ सीमा रेषेवर तैनात केले आहेत. त्यांच्याकडे हॉवित्झर तोफा, रणगाडे आणि पृष्ठभागावरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंचे सैनिक नियमितपणे बदलत राहतात.

लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत विस्तारलेल्या या प्रदेशात चीनने अनेक हवाई पट्ट्या आणि नवीन हेलिपॅड देखील बांधले आहेत. यासह, चीनने होतन, काशगर, गारगुन्सा, ल्हासा-गोंगगर आणि शिगत्से हेआपले प्रमुख हवाई तळ अद्यावत केले आहेत.

China reactivates on border: Tents pitched on Ladakh border; Military camps in eight places, 84 tents in each place

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात