कॅप्टनचा नेहले पे देहला, पाकिस्तानी मैत्रिणीबाबत टीका झाल्यावर तिचा सोनिया गांधींसोबतचा फोटो केला ट्विट


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : हात दाखवून अवलक्षण करून घेण्याचा अनुभव पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांना आला. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण अरूसा आलम आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संबंधांची चौकशी करणार असल्याचे म्हटले. या आरोपांनंतर अमरिंदर सिंग यांनी अरूसा आलम यांचा आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा फोटो ट्विट करत सुखजिंदर सिंग रंधावा यांना चांगलाच दणका दिला.Captain’s Nehle Pay Dehla tweets photo of her with Sonia Gandhi after criticism over Pakistani friend

सुखजिंदर सिंग रंधावा यांनी पंजाबीमध्ये एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अरूसा आलम यांच्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. मात्र, टीकेनंतर सुखजिंदर सिंग यांनी काही वेळेतच हे ट्वीट डिलीट केलं.



दरम्यान, पत्रकारांनी गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सुखजिंदर सिंग यांना अरूसा आलम पाकिस्तानच्या हस्तक आहेत का असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अरूसा आलम यांचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी काय संबंध आहेत हे पोलीस महासंचालकांना तपासण्यास सांगणार असल्याचं म्हटलं. याशिवाय अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना पाकिस्तानमधून आलेल्या ड्रोनचीही चौकशी करणार असल्याचं सांगितलंय.

अमरिंदर सिंग यांनी आपल्यावरील या आरोपांवर तात्काळ प्रत्युत्तर दिले. अमरिंदर सिंग यांचे सल्लागार रवीन ठुकराल यांनी अमरिंदर सिंग यांचा हवाला देत एकामागोमाग एक ट्वीट करत हल्ला चढवला. अमरिंदर सिंग म्हणाले, “कॅबिनेटमधील सहकारी म्हणून सुखजिंदर सिंग यांनी कधीही अरूसा यांच्याबाबत तक्रार केल्याचं मला आठवत नाही. अरूसा मागील १६ वर्षांपासून भारत सरकारच्या मंजुरीनुसार भारतात येतात. या काळात एनडीए आणि युपीए सरकारचा देखील पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध होता असं तुम्हाला म्हणायचं आहे का?”

Captain’s Nehle Pay Dehla tweets photo of her with Sonia Gandhi after criticism over Pakistani friend

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात