अयोध्येत श्री राम मंदिर उभारण्यासाठी चंपत राय बन्सल यांचे योगदान अमूल्य


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्येत श्री रामाचे भव्यदिव्य मंदिर उभारण्याच्या कार्यात चंपत राय बन्सल यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्वाहिंदू परिषद आणि रामजन्मभूमी मुक्तीसाठी त्यांनी केलेले कार्य अफाट आहे. श्री राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्टचे महासचिव असलेले चंपातराय बन्सल यांच्या कार्याचा घेतलेला वेध..build Shri Ram Temple in Ayodhya The contribution of Champat Rai Bansal is invaluable

उत्तरप्रदेशातील नगीना (जिल्हा बीजनौर) येथे चंपतराय बन्सल यांचा १८ नोव्हेंबर १९४६रोजी जन्म झाला. सरायमीर येथील रहिवासी रामेश्वर प्रसाद व सावित्री देवी यांच्या परिवारात त्याचा जन्म झाला. दहा बहीण भावंडात चंपतराय बन्सल हे दुसरे अपत्य होते.वडील रामेश्वर प्रसाद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. लहानपणापासून अभ्यासात ते हुशार होते.बोले तैसा चाले

देशात २५ जून १९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागून केली. तेव्हा रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले चंपतराय हे धमापूर येथील आरएसएम कॉलेजमध्ये शिकवत होते. अटक करणाऱ्यास आलेल्या पोलिसांना वर्ग संपला की, घरातून कपडे घेऊन ठाण्यात पोचतो, असे सांगितले.

आई वडिलांना प्रकार सांगितला. विशेष म्हणजे, ते नंतर ठाण्यात स्वतःच पोचले. बोले तैसा चाले अशी त्यांची वर्तणूक आहे. सुमारे १८ महिने ते तुरुंगात होते. आणीबाणीनंतर त्यांची सुटका झाली. १९८०-८१मध्ये प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले.

डेहराडून, सहरणपुर येथे संघकार्य केले. १९८५ मध्ये ते मेरठचे विभाग प्रचारक होते. १९८६ मध्ये संघाच्या सर्वोच्च नेत्याने त्यांना प्रांतीय संघटना मंत्री म्हणून विश्व हिंदू परिषदेकडे पाठवले. १९९१ मध्ये त्यांना प्रादेशिक संघटनेचे मंत्री म्हणून अयोध्येत पाठवण्यात आले. १९९६ मध्ये त्यांना विहिंपचे केंद्रीय मंत्री केले गेले. २००२ मध्ये त्यांना संयुक्त महामंत्री आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय महामंत्री करण्यात आले.

राममंदिर उभारण्यासाठी जीवाचे रान

विहिपचे अंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष व श्री रामजन्म भूमि तीर्थ क्षेत्रचे महासचिव आहेत. त्यापूर्वी त्यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी जीवाचे रान केले. त्यासाठी अयोध्येचा संपूर्ण अभ्यास केला. तरुणांची फौज उभी केली. अयोध्येत मंदिरासंदर्भात प्रचंड कागदपत्र गोळा केली. या कागदपत्रांनी त्यांचे राहते घर भरून गेले.

अयोध्या- बाबरी मशीद खटल्यात ते मंदिराचे पक्षकार म्हणून उभे राहिले. आयोध्येत मंदिरच होते हे पुराव्यानिशी सांगणारा चालत बोलता इन्साक्लोपीडिया म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच त्यांनी राममंदिर उभारणीच्या कामाला वेग दिला. तेव्हा ते अयोध्येच्या दौऱ्यावर होते. नकाशा, मंदिर भूमीपूजन या कार्याची आखणी केली. ५ ऑगस्टला मूर्त स्वरूप दिले.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजनही झाले. याचे सर्व श्रेय चंपत राय यांनाच जाते.

इतिहासात दृष्टिक्षेप

६ डिसेंबर १९९२ रोजी व्यासपीठावरील मोठे नेते कारसेवकांना शिस्तीचे धडे देत होते. सर्व सूचना दिल्या जात होत्या. त्यावेळी चंपत राय हे स्थानिक युवकांसमवेत स्टेजपासून काही अंतरावर होते, जेव्हा बाबरी मशिदीच्या धक्का लावला जाणार नाही, असे वचन दिले जात होते. ए

का पत्रकाराने चंपत राय यांना विचारले “आता काय होईल?” ते हसले आणि उत्तरले “ही रामची वानर सेना आहे, शिट्टीवर पिटी करण्यासाठी आलेली नाही…. जे काही करायचे आहे ते ती करेल.”
असे सांगून त्यांनी हातात एक फावडा घेतला

आणि बाबरी ढाचाकडे वाटचाल केली, तेव्हाच जय श्री राम यांचा जयघोष झाला आणि… इतिहास निर्माण झाला. आदरणीय चंपत राय यांना फक्त राम मंदिर ट्रस्टचा सचिव बनवले गेले नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रामललाच्या चरणी अर्पण केले आहे. त्यांना “राम लल्लाचे पटवारी” असे कौतुकाने म्हटले जाते. ही व्यक्ती सनातन योद्धा आहे.

बाबरी पाडण्याच्या घटनेची जबाबदारी उघडपणे कल्याणसिंह आणि चंपत राय यांनी नेहमीच घेतली. न्यायालयात आणि सर्वसामान्यांसमोर उघडपणे आम्ही हे केले असे सांगितले. तसेच राम मंदिराचा कळस पाहताच आम्ही तरुण पिढीला मथुरेची जबाबदारी पार पाडण्यास प्रवृत्त करू.

धर्मातील छोट्या छोट्या गोष्टींची काळजी

चंपत राय हे धर्मातील छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणारे एक तपस्वी व विद्वान आहेत. एकदा काशीत त्यांना कामानिमित्त रात्री थांबावे लागले. तेव्हा त्यांनी पाहिले की पलंगाची दिशा अशी आहे की झोपेवेळी पाय दक्षिणेकडे जात आहेत. एका रात्रीसाठी ही बाब स्वीकारली नाही.

रात्री पलंगाची दिशा योग्य केल्यानंतर झोपी गेले. धोती कुर्ता घालून भारतातील खेडेगावात जायला त्यांना आवडते. तेथील परिस्थितीचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे वैयक्तिक जीवनात हिंदू जीवनशैलीच्या छोट्या छोट्या गोष्टी जिद्दीने पाळण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे. ते अविवाहित असून हिंदू समुदायाच्या विकासासाठी त्यांचे अखंड सुरु असलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत.

build Shri Ram Temple in Ayodhya The contribution of Champat Rai Bansal is invaluable

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती