विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पूर्ण लसीकरण झालेल्यांनाही पुन्हा कोरोना विषाणूची बाधा होत असून विषाणूचे नवनवीन व्हेरिएन्ट समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून लाभार्थींना ‘बूस्टर डोस’ देण्याची चाचपणी सुरू आहे. Booster dose will help on corona
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस परिणामकारक ठरू शकतो; मात्र त्यापूर्वी अभ्यास होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांनाही संसर्ग होत आहे; मात्र हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
दोन्ही डोस घेतल्यानंतर पुन्हा संसर्ग का होतो, याची कारणे शोधणे महत्त्वाचे आहे. दोन्ही डोसनंतर काहींना कोरोनाची लागण झाली असली, तरी ते उपचारांशिवाय बरे झाले आहेत. ज्यांना अद्याप बाधा झाली नाही त्यांच्या शरीरातील अॅण्टीबॉडीजचा अभ्यास व्हायला हवा. शिवाय लसीकरणानंतर अॅण्टीबॉडीज किती दिवस टिकतात, याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. काही देशांमध्ये ८० टक्के लसीकरण झाले आहे. तरीही अशा देशांमध्ये कोरोनाची चौथी, पाचवी लाट आली आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे.
तज्ञांच्या मते लसीकरणानंतर संसर्ग झालेल्यांची नेमकी आकडेवारीही उपलब्ध नाही; मात्र आता दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग का होत आहे, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. तज्ञांच्या मते लाभार्थींची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे की विषाणूंच्या नवीन व्हेरिएन्टमुळे संसर्ग होत आहे, याचा शोध लावणे महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App