Make in India ला बुस्टर डोस : ६ पाणबुड्या बांधणीसाठी लवकरच भारतीय नौदलाचे ५०००० कोटींचे टेंडर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – कोरोना काळात देशाच्या संरक्षण व्यवस्थेत शैथिल्य यायला नको, तसेच Make in India संकल्पनेलाही प्रोत्साहन मिळाले पाहिजे, या हेतूने भारतीय नौदलाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. Indian Navy set to issue Rs 50,000 crore tender for submarines

देशाच्या सागरी सीमांच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ६ पाणबुड्या भारतातच बांधण्यासाठी ५०००० कोटींचे टेंडर काढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. माझगाव गोदीत या पाणबुड्यांची बांधणी होईल, असे सरकारी सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

पी – ७५ असे या प्रकल्पाचे नाव असून या पाणबुड्या भारतातच बांधल्या गेल्या पाहिजेत ही टेंडरमधली पहिली अट असणार आहे. प्रचंड क्षेपणास्त्र मारकक्षमतेच्या स्कॉर्पिअन बनावटीच्या आयएनएस कलावरीसारख्या ६ पाणबुड्या बांधण्यात येतील. भारतीय नौदलाची २४ पाणबुड्या खरेदीची योजना आहे. यापैकी ६ पाणबुड्या आण्विक असतील.

पाणबुडी बांधणीतला तांत्रिक स्ट्रॅटेजिक पार्टनर कंपनी लार्सन अँड टर्बो असेल. त्याचबरोबर फ्रान्स, रशिया, जर्मनी, दक्षिण कोरिया, आणि स्पेनमधील कंपन्यांशी देखील तंत्रज्ञान करार होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

येत्या काही दिवसांमध्येच संरक्षण मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर बैठक होऊन या टेंडरबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. पाणबुड्या भारतातच बांधण्यात येतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Indian Navy set to issue Rs 50,000 crore tender for submarines

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण