अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये पुन्हा घसघशीत वाढ, शंभर अब्जाधीशांत स्टार्ट अपच्या प्रमुखांचा समावेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – फोर्ब्स मासिकाने २०२१ या वर्षातील भारतातील सर्वाधिक १०० श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ६.८९ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वोच्च स्थानी राहिले आहेत. भारतातील या शंभर श्रीमंतांची एकूण संपत्ती ५८.०६ लाख कोटी रुपये आहे.Billionaire will became richer

५.६ लाख कोटी रुपयांच्या एकूण उलाढालीसह अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर ३१ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह देशातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.एका कल्पनेचे मोठ्या उद्योगात रूपांतर करणाऱ्या काही स्टार्टअप संस्थापकांचाही या यादीत समावेश आहे. फोर्ब्सच्या यादीत ४७ व्या स्थानी बायजूचे रविंद्रन आणि त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ असून ८६ व्या क्रमांकावर झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ आणि निखिल कामथ आहेत.

पेटीएमची संस्थापक विजय शेखरही या १०० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असून ते ९२ व्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार डी-मार्टचे राधाकृष्ण दमानी भारतातील चौथ्या श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांच्याकडे एकूण २९.४ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

Billionaire will became richer

महत्त्वाच्या बातम्या