जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांच्या बद्दल थोडंस


तुझ्या प्रयत्नांना मिळू दे,

यशाची सोनेरी किनार,

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे,

तुझ्या कतृत्वाची झालर,

स्त्रीशक्तीचा होऊ दे,

पुन्हा एकदा जागर…

पुन्हा एकदा जागर!

कोरोना महामारीचा काळ आला आणि सर्वांची देवाची व्याख्या बदलली. हॉस्पिटलमध्ये सतत काम करणारे, लोकांचा जीव वाचवणारे डॉक्टरच खरे देव आहेत. ह्याची प्रचिती जवळजवळ सर्वांना आलीच असणार. आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेमधून भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाचा, संशोधनाचा ठसा उमटवनाऱ्या सौम्या स्वामिनाथन ह्या एक अनन्य साधारण व्यक्ती आहेत. आज आपण त्यांच्या बद्दप त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या कामा बद्दल थोडंस जाणून घेणार आहोत…

सौम्या स्वामीनाथन ह्या एक भारतीय बालरोगतज्ञ आणि क्लिनिकल शास्त्रज्ञ आहेत. स्वामिनाथन क्षयरोग आणि एचआयव्हीवरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत. मार्च २०१९ पासून स्वामीनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेमध्ये मुख्य वैज्ञानिक म्हणून काम करत आहेत. तर ऑक्टोबर,२०१७ ते मार्च,२०१९ पर्यंत स्वामिनाथन जागतिक आरोग्य संघटनेमध्ये उपमहासंचालक (DDP) म्हणून काम पाहत होत्या.

सौम्या यांचे कुटुंब :

स्वामीनाथन यांचा जन्म २ मे १९५८ रोजी चेन्नई येथे झाला. ‘भारताच्या हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे एम एस स्वामीनाथन आणि भारतीय शिक्षण तज्ज्ञ मीना यांची मुलगी म्हणजे सौम्या स्वामीनाथन. त्यांची बहीण ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे अर्थशास्त्राच्या प्रोफेसर म्हणून काम करतात. तर त्यांची दुसरी बहीण नित्या स्वामिनाथन युनिव्हर्सिटी ऑफ अंजीला येथे सीनियर लेक्चरर ऑफ जेंडर अनालीसिस इन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट म्हणून काम करतात. सौम्या यांच्या घरातील वातावरण अतिशय अभ्यासु आहे. हे तुम्हाला आताशा कळले असणारच.

सौम्या यांचे शिक्षण :

सौम्या यांनी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथून आपली एमबीबीएस ही डिग्री पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, न्यू दिल्ली येथून पेडियट्रिक्स मधून त्या एमडी झाल्या. सध्या त्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सच्या डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड म्हणून काम करत आहेत. १९८७ ते १९८९ या काळात त्यांनी  निओनॅटॉलॉजी आणि पेडियाट्रिक पल्मोनोलॉजी या विषयातून पोस्ट डॉक्टरल मेडिकल फेलोशिप चिल्ड्रन्स हॉस्पिटल लॉस एंजेल्स येथून पूर्ण केली.

सौम्या यांचे सुरुवातीचे करियर :

१९८९ ते १९९० पर्यंत स्वामीनाथन युनायटेड किंग्डममधील लेसेस्टर विद्यापीठातील बालरोग तसेच श्वसन रोग विभागात रिसर्च फेलो म्हणून काम करत होत्या.

त्यानंतर त्यांनी वरिष्ठ संशोधन अधिकारी (सुपरन्यूमरीरी रिसर्च कॅडर), कार्डिओपल्मोनरी मेडिसिन युनिट, तसेच न्यू जर्सीच्या टफ्ट्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कौटुंबिक औषध विभागात सहाय्यक सहयोगी क्लिनिकल प्राध्यापक म्हणून काम केले. १९९२ मध्ये स्वामीनाथन यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्यूबरक्युलोसिस केंद्र जॉईन केले होते. जिथे त्यांनी सुरुवातीला समन्वयक म्हणून काम केले व त्यानंतर त्यांनी दुर्लक्षित ट्रॉपिकल रोगात संशोधन केले. पुढे जाऊन त्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्यूबरक्युलोसिस केंद्राच्या संचालक बनल्या.

२००९ ते २०११ पर्यंत स्वामिनाथन युनिसेफ/यूएनडीपी/जागतिक बँक/डब्ल्यूएचओच्या जिनिव्हामधील उष्णकटिबंधीय रोगांच्या संशोधन आणि प्रशिक्षणासाठी आयोजिय केलेल्या विशेष कार्यक्रमा मध्ये समन्वयक म्हणून काम केले. २०१३ पर्यंत त्या चेन्नईमधील राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेच्या (NIRT) संचालक होत्या.

सौम्या स्वामिनाथन यांचे WHO सोबतचे काम :

ऑगस्ट २०१५ ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत स्वामीनाथन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक आणि भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय) सचिव होत्या. तर ऑक्टोबर २०१७ ते मार्च २०१९ पर्यंत स्वामीनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या उपमहासंचालक होत्या.

मार्च २०१९ मध्ये स्वामीनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ बनल्या. त्यांनी त्यांनी कोविड -१९ साथीच्या आजारा संबंधी बरीच माहिती त्या नियमितपणे आठवड्यातून दोन वेळा पत्रकार परिषदेत घेऊन द्यायच्या. मे २०२१ मध्ये युरोपियन कमिशन आणि G२० द्वारे आयोजित ग्लोबल हेल्थ शिखर परिषदेमध्ये स्वामीनाथन कार्यक्रमाच्या उच्च स्तरीय वैज्ञानिक पॅनेलमधील सदस्या होत्या. बालरोग आणि प्रौढ क्षयरोग (टीबी) हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहे.

महामारी, विज्ञान आणि रोगजनन आणि एचआयव्ही इत्यादी अनेक रोगांवर बारकाईने अभ्यास त्यांनी केला आहे. स्वतः अभ्यास तर त्या करतातच पण देशातील युवा पिढीला ह्या विषयातील संशोधनात रस निर्माण व्हावा यासाठीही त्या प्रयत्न शील असतात. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्यूबरक्युलोसिस चेन्नई येथे स्वामीनाथन यांनी टीबी आणि टीबी/एचआयव्हीच्या विविध पैलूंचा अभ्यास करणाऱ्या क्लिनिक, प्रयोगशाळा उभ्या केल्या आहेत. तर शास्त्रज्ञांचा एक बहु-अनुशासनात्मक गट देखील सुरू केला आहे. २०२१ मध्ये, स्वामीनाथन यांना पॅनडेमीक प्रेपरेडनेस पार्टनरशिप (पीपीपी) मध्ये नियुक्त करण्यात आले आहे होते. कोरोना महामारीला सामोरे जाण्यासाठ पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारकडे आयोजित केलेल्या G7 प्रेसिडेन्सी मध्ये विशेष तज्ञ म्हणून नियुक्त झाल्या होत्या. WHO आणि युके सरकारसाठी त्यांनी कोरोना महामारी काळात संशोधन, चिकित्सा अश्या बऱ्याच माध्यमातून संपूर्ण जगाची सेवा केली आहे.

सौम्या स्वामिनाथन यांना मिळालेले पुरस्कार : 

१९९९: इलेव्हन नॅशनल पेडियाट्रिक पल्मोनरी कॉन्फरन्स, डॉ. केया लाहिरी गोल्ड मेडल बेस्ट पेपरसाठी

२००८: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, क्षनिका ओरेशन अवॉर्ड

२००९: टीबी आणि फुफ्फुसांच्या आजारांविरुद्ध आंतरराष्ट्रीय संघ, उपाध्यक्ष, एचआयव्ही विभाग

२०११: इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, फेलो

२०११: इंडियन असोसिएशन ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजिस्ट, लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार

२०१२: तामिळनाडू विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार

२०१२: नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया, फेलो

२०१३: इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, बंगलोर, फेलो,

२०१६: NIPER, ASTRAZENECA संशोधन बंदोबस्त पुरस्कार

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात