विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी सर्वाधिक कोरोना लसीकरणाचा चीनचा विश्वविक्रम मोडताना भारताने एका दिवसात तब्बल किमान २.४७ कोटी नागरिकांचे लसीकरण केले. Bihar on top in vaccination
को-विन पोर्टलच्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या वाढदिवशी सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये चार राज्य भाजपशासित आहेत. लसीकरणात बिहारने पहिला क्रमांक पटकाविला आहे.
एकट्या बिहारमध्ये एका दिवसात २९ लाख ३८ हजार ६५३ लोकांचे लसीकरण झाले. बिहार पाठोपाठ कर्नाटक आणि उत्तर प्रदेशाचा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशात एका दिवसात २६ लाख ६३ हजार ६५६ लोकांना तर कर्नाटक मध्ये २८,४२,०७७ लोकांना लसीकरण करण्यात आले. लोकसंख्येचे प्रमाण नजरेआड केले तरी नऊ कोटी लसीकरण करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याआधी देखील एका दिवसात ३३ लाख नागरिकांना लसीकरण करण्याचा विक्रम उत्तर प्रदेशने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App