आई-वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांनो घरातून बाहेर पडा, उच्च न्यायालयाचे आदेश


विशेष प्रतिनिधी

मुंबई – नव्वदीत असलेल्या आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचा छळ करणारा मुलगा आणि सुनेला घरातून बाहेर पडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच ज्येष्ठ पालकांनी स्वत:च्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आणि स्वतःच्याच मुलांपासून होणारा छळ रोखण्यासाठी न्यायालयात दाद मागावी, असेही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी निकालात म्हटले आहे. Quit the home, court tells boy and his wife

मुंबईमध्ये राहणाऱ्या आशीष दलाल आणि त्यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने उलट त्यांनाच खडे बोल सुनावत हा निर्णय दिला आहे. ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण मंचाने दलाल आणि त्यांच्या कुटुंबाला आई-वडिलांचा छळ करत असल्याने वडिलांच्या घरातून बाहेर जाण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाविरोधात त्यांनी याचिका केली होती. ही याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी यांनी या सर्व परिस्थितीवर खेद व्यक्त केला आहे.

स्वतःचा एकुलता एक मुलगा आणि सुनेकडून आई-वडिलांचा होणारा छळ दुर्दैवी आहे. जाणीवपूर्वक मुलगा आणि सून त्यांच्या पालकांचा छळ करत आहेत आणि त्यांच्या सर्वसाधारण आयुष्यात अडसर निर्माण करत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. विशेष म्हणजे मुलगा आशीष दलाल याचे स्वतःचे दहिसर आणि नवी मुंबईमध्ये तीन फ्लॅट आहेत. तरीसुद्धा मुलगा आणि सून हट्टाने मुंबईमधील वडिलांच्या घरात राहत होते. न्यायालयाने याची दखल घेतली आणि मुलाला आणि सुनेला तीस दिवसांत जागा खाली करण्याचे आदेश दिले.

Quit the home, court tells boy and his wife

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात