कोरोना महामारीतील मंदीविरुध्द लढण्यासाठी नोटा छापा, बॅँकर उदय कोटक यांचे सरकार आणि रिझर्व्ह बॅँकेला सल्ला


कोरोना महामारीमुळे देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामुळे समाजातील गरीबांना मदत करण्यासाठी नोटा छापा असा सल्ला प्रसिध्द बॅँकर उदय कोटक यांनी दिला.Banker Uday Kotak’s advice to the government and the Reserve Bank to Banknote printing notes


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना महामारीमुळे देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. त्यामुळे समाजातील गरीबांना मदत करण्यासाठी नोटा छापा असा सल्ला प्रसिध्द बॅँकर उदय कोटक यांनी दिला.

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कोटक महिंद्रा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे देशातील गोरगरीब आर्थिक संकटात सापडले आहेत.सरकारने एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील (जीडीपी) किमान एक टक्का रक्कम गोरगरीबंसाठी खर्च करायला हवी. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेच्या पिरॅमिडमध्ये सर्वात तळाशी असलेल्या या लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढेल.

कोरोना महामारीमुळे रोजगार गेल्यामुळे समाजातील मोठा वर्ग संकटात सापडला आहे. दुसरा मोठा वर्ग आपला उद्योग-व्यापार बंद पडल्याने अडचणीत आहे.

त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करायला हवेत. या नव्या जगात ते जगू शकणार नाहीत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयतन करायला हवेत.

त्यासाठी काहीतरी मार्ग शोधायला हवा. उद्योग व्यापार बंद पडल्याने अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात अडकणे जादा काळ परवडणार नाही. त्यामुळे नोटा छापून का होईना त्यांना मदत करायला हवी.

मंदीमुळे बॅँकांमध्येही अनेक समस्या आहेत. त्यांनाही फटका बसला आहे. रिझर्व्ह बॅँकेकडून बॅँकांना मदत केली जात आहे. मॉनीटोरियम आणि इतर सुविधा दिल्या जात आहेत.

सरकारकडून मिळणाºया गॅरंटीमुळे बॅँका काही काळ हे संकट सहन करू शकतात. त्यासाठी सरकारनेही काही भार सोसला पाहिजे. कारण सरकारकडे आर्थिक अवकाश आहे.

बॅँका आणि बिगर बॅँकीग आर्थिक संस्थांनी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात भांडवल जमा केले आहे. भांडवल हा आर्थिक क्षेत्राचा प्राणवायू आहेत.

Banker Uday Kotak’s advice to the government and the Reserve Bank to Banknote printing notes

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय